नाशिक

परसूलजवळ पुलाखाली हात-पाय बांधलेला मृतदेह

कमरेला डंबेल्स अन् तोंड बांधलेली अवस्था

चांदवड : वार्ताहर
चांदवड-निफाड मार्गावरील परसूल शिवारात रविवारी सकाळी अज्ञात पुरुषाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृताचे हात-पाय नायलॉनच्या दोरीने बांधलेले असून, मृतदेह पाण्यात बुडालेला राहावा, या हेतूने त्याच्या कमरेला 30 किलो वजनाचे लोखंडी डंबेल्स बांधलेले आढळले आहेत. हा प्रकार घातपाताचा असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. 22) सकाळी 9 वाजेच्या सुमारास परसूल-चिंचोली नदीच्या पुलाखाली एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक नागरिकांना दिसला. परसूल येथील पोलीसपाटील सोनाली विजय सोनवणे यांनी तत्काळ या घटनेची माहिती चांदवड पोलीस ठाण्याला दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला.
मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांना धक्कादायक दृश्य पाहायला मिळाले. मयताचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने एकमेकांना आणि मांडीला घट्ट बांधलेले होते. तसेच, मृतदेह पुन्हा वर येऊ नये यासाठी आरोपींनी त्याच्या कमरेला 20 ते 30 किलो वजनाचे जिममधील डंबेल्स बांधले होते. मयताचे तोंडही कापडाने बांधलेल्या अवस्थेत मिळून आले.
मयत व्यक्तीचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे. त्याच्या अंगात लाल हुडी टी-शर्ट, राखाडी रंगाची ट्रॅक पँट आणि पायात 9 नंबरची पॅरेगॉन कंपनीची चप्पल आहे. पोलिसांनी सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चांदवड ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे.

पोलीस तपास सुरू

या गंभीर घटनेचा तपास चांदवड पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. बी. मोरे करत आहेत. ही हत्या पूर्ववैमनस्यातून झाली असावी किंवा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह येथे आणून टाकला असावा, असा संशय व्यक्त होत आहे. अद्याप मयताची ओळख पटलेली नसून, नागरिकांनी या वर्णनाच्या व्यक्तीबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Body found tied with hands and feet under bridge near Parasul

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

गुन्हेगारीच्या छायेत हरवणारा समाज…

खरंतर समाजात वावरताना वारंवार जाणवणार्‍या या वास्तवामुळेच हा विषय मांडावासा वाटला. कारण तो मांडणं ही…

45 seconds ago

स्वमग्नता

अगं आई तो बघ! मावशींचा मुलगा कसे करतो आहे. तो जरा वेडा आहे का? हात…

7 minutes ago

शेतीमातीची माणसं…

शेतीची माणसं म्हणजे काळ्या आईची लेकरं.. या काळ्या मातीशी त्यांची नाळ घट्ट जुळलेली असते. या…

24 minutes ago

कायद्याच्या बालेकिल्ल्यात ऑनलाइन रोलेटचा सुळसुळाट

सिडको : दिलीपराज सोनार नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत असलेल्या…

39 minutes ago

वावी परिसराचा दुष्काळ हटणार

कोकाटेंच्या पुढाकाराने 1500 हेक्टर क्षेत्र येणार ओलिताखाली सिन्नर : प्रतिनिधी भौगोलिक विषमतेमुळे कायम अवर्षणप्रवण म्हणून…

45 minutes ago

माळमाथा परिसरातील पाणी योजनेचा बोजवारा

दूषित पाण्यामुळे 25 गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात मालेगाव : प्रतिनिधी तालुक्यातील माळमाथा परिसरातील दहिवाळसह सुमारे…

52 minutes ago