सिडको विशेष प्रतिनिधी :
-पाथर्डी पंचक्रोशीतील पिंपळगाव खांब येथील माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याचा वावर दिसून येत होता. या बिबट्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. काही दिवसांपूर्वी बिबट्याने एका शेतमजुरावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता, त्यामुळे शेतकरी व मजुरांमध्ये भीती अधिकच वाढली होती.
या बिबट्याला पकडण्यासाठी शेतात तात्काळ पिंजरा लावण्याबाबत शेतकरी स्थानिक शेतकरी शिवाजी चुंबळे यांनी वनविभागाकडे मागणी यांनी केली होती. त्यानुसार वनविभागाने तत्परता दाखवत शेताजवळ पिंजरा लावला. काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर बुधवार, दि. ४ जून रोजी रात्रीच्या सुमारास बिबट्या त्या पिंजऱ्यात अडकला. बिबट्याच्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
या घटनेमुळे परिसरातील शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामस्थांमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या बिबट्याला पुढील उपचार आणि परीक्षणासाठी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. वनविभागाच्या या तात्काळ कारवाईचे परिसरात कौतुक होत आहे. बिबट्याचा वावर संपल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामात पूर्वीसारखेच लक्ष देता येणार आहे.बिबट्या पकडण्यात यश आल्यामुळे वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानण्यात येत आहेत. दरम्यान हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती मिळताच मळे परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांसह शेतमजूरांनी बिबट्याला बघण्यासाठी गर्दी केली होती
मुंबई: विधिमंडळात ऑनलाईन रमी खेळल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेलं कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या खात्यात बदल करण्यात…
मालेगाव बॉम्बस्फोटातील पीडित परिवार जाणार सुप्रीम कोर्टात मनमाड : आमिन शेख गेल्या सतरा वर्षांपासून न्यायच्या…
नाशिक: प्रतिनिधी संपूर्ण राज्यात गाजलेल्या मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल आज जाहीर करण्यात आला. न्या, ए…
नाशिक:प्रतिनिधी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची, जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात…
भिकाऱ्याकडे साडेसात कोटींची संपत्ती! मुंबईत दोन मोठे फ्लॅट, ठाण्यात दुकानांसह बरंच काही शहापूर : साजिद…
भारतीय परंपरेतील प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा संस्कार आहे विवाह. हे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वळणच…