नाशिक

मनमाडला अर्धी वाळू टाकून दुप्पट पैसे घेणार्‍या वाळू विक्रेत्यावर गुन्हा दाखल

मनमाड ः प्रतिनिधी
मनमाड शहर परिसरातील बांधकाम व्यावसायिकांसह घराचे बांधकाम करणार्‍या नागरिकांना अर्धी वाळू टाकून दुप्पट (डबल) बिल देऊन जास्त पैसे घेत फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घराचे बांधकाम करणार्‍या नागरिकांनी शहानिशा करूनच वाळू खरेदी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक विजय करे यांनी केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मनमाड शहर परिसरात अनेक वाळू विक्रेते आहेत. एजंटही आहेत. मात्र, काही एजंटकडून तसेच काही वाळू विक्रेत्यांकडून 42 ब्रास वाळू 80 ब्रास सांगून दुप्पट पैसे उकळण्याचा गोरखधंदा सुरू आहे. याचा मनमाड शहर पोलीस निरीक्षक करे यांनी पर्दाफाश केला आहे. याबाबत मनमाड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार वे-ब्रिज(वजनकाटा)ला हाताशी धरून सुरू असल्याचे समोर आले आहे. वजन करताना एक पूर्ण गाडी उभी करून दुसर्‍या गाडीचा मागचा भाग वजनकाट्यावर उभा करायचा.
यामुळे वजनात दुप्पट वाढ होऊन बिलाची पावती 40 ऐवजी 80 ब्रासची येते. हीच पावती देऊन ग्राहकांकडून दुप्पट पैसे उकळण्याचा गोरखधंदा राजरोस सुरू होता. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आहे. विशेष म्हणजे, याची मोठी साखळी कार्यरत आहे. त्याचा सखोल तपास सुरू आहे. आजपर्यंत किती लोकांना फसवले, याचाही तपास सुरू आहे.

वाळू चोरीचा हा नवीन प्रकार समोर आला आहे. शहरातील अनेक व्यावसायिकांचीदेखील फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. यात काही वाळू विक्रेते, तर काही वाळू विक्री करणारे एजंट आहेत. या सर्वांचा आम्ही तपास सुरू केला आहे. शहरातील बांधकाम व्यावसायिक व बांधकाम सुरू असणार्‍यांंनी वाळू विकत घेताना तपासून घ्यावी. काही शंका आली तर गाडीचे पुन्हा वजन करून घ्यावे.
– विजय करे, पोलीस निरीक्षक, मनमाड

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

20 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

20 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

20 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

20 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

21 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

21 hours ago