आस्वाद

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात
घेतला निर्णय भारी,
आणि आयुष्यभरासाठी
पडली दुःखांची वारी!
डोळ्यांत होती स्वप्नं,
मनात होती उमेद,
पण एका चुकीनेच
संपली जगण्याचीच खेळमेळ!
माणसाचं आयुष्य हे देवाने दिलेलं सर्वात सुंदर देणं आहे. पण कधी कधी एका चुकीच्या निर्णयामुळे हे सुंदर आयुष्य कायमचं अंधारात हरवून जातं. क्षणिक राग, भावना, हट्ट, गैरसमज किंवा चुकीच्या लोकांच्या संगतीत घेतलेला निर्णय माणसाला अशा खोल दरीत ढकलतो, जिथून परत येणं खूप कठीण होतं.
आज अनेक घरांमध्ये हसणं हरवलं आहे कारण त्या घरातील एखाद्या व्यक्तीने भावनेच्या भरात घेतलेला चुकीचा निर्णय संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेला. ज्या आईने स्वतः उपाशी राहून मुलाला घास भरवला, ज्या वडिलांनी उन्हात घाम गाळून लेकरांच्या स्वप्नांसाठी आयुष्य झिजवलं, त्याच आई-वडिलांच्या डोळ्यांसमोर जेव्हा त्यांचं लेकरू चुकीच्या मार्गावर जातं, तेव्हा त्यांच्या जिवंतपणीच त्यांचं जग संपतं.
एका चुकीच्या निर्णयाने फक्त एक व्यक्ती हरवत नाही, तर संपूर्ण घर रोज थोडं थोडं मरत असतं. घरातील भिंती शांत होतात आईचं हसणं हरवतं वडिलांचा आधार तुटतो आणि लहान भावंडांच्या डोळ्यांत भीती घर करते. काही तरुण वाईट मित्रांच्या संगतीत जाऊन व्यसनांच्या आहारी जातात. सुरुवातीला फक्त एकदाच म्हणून घेतलेली सवय नंतर आयुष्याची शिक्षा बनते. शरीर संपतं, पैसा संपतो, नाती संपतात आणि शेवटी माणूस स्वतःलाच हरवून बसतो.
काही जण प्रेमभंगामुळे खचतात. ज्याच्यासाठी पूर्ण जग विसरलं, ती व्यक्ती सोडून गेल्यावर आयुष्यच संपल्यासारखं वाटतं. पण त्या वेळी आईच्या डोळ्यांतलं प्रेम दिसत नाही, वडिलांच्या मनातील काळजी जाणवत नाही. एक चुकीचा निर्णय घेतल्यानंतर मागे उरतात फक्त फोटोसमोर रडणारे आई-वडील आणि आयुष्यभर न भरून येणारी पोकळी. परीक्षेत अपयश आलं म्हणून, नोकरी मिळाली नाही म्हणून, कर्ज वाढलं म्हणून किंवा समाज काय बोलेल या भीतीने काही लोक टोकाचं पाऊल उचलतात. पण ज्यावेळी घरात त्या व्यक्तीचा आवाज कायमचा बंद होतो, तेव्हा त्या घरातील प्रत्येक वस्तू रडत असते. आईच्या हातातील थरथरणारं ताट, वडिलांच्या डोळ्यांतलं न बोललेलं दुःख, आणि रिकाम्या खोलीत पडलेली स्वप्नं हे सगळं आयुष्यभर जखम बनून राहतं.
जीवनात कितीही मोठं संकट आलं तरी त्यावर मार्ग असतो. वेळ वाईट असू शकते, पण कायमची नसते. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ नक्की उगवते. पण एका चुकीच्या निर्णयामुळे उगवणारी अनेक सकाळ कायमची काळोखी होऊन जाते.
आज गरज आहे ती संवादाची, आधाराची आणि समजून घेण्याची. प्रत्येकाने आपल्या माणसांना वेळ द्यायला हवा. कारण कधी कधी एखाद्या व्यक्तीला फक्त दोन प्रेमाचे शब्द आणि मी तुझ्यासोबत आहे हे ऐकायचं असतं. जाणारी व्यक्ती एका क्षणात निघून जाते, पण मागे उरतात आयुष्यभर रडणारी माणसं. आई रोज दाराकडे पाहत राहते वडील शांतपणे अश्रू लपवत जगत राहतात आणि रिकाम्या खोलीत आठवणींचा आवाज घुमत राहतो म्हणून कितीही मोठं दुःख असलं, कितीही कठीण प्रसंग आला, तरी स्वतःला संपवू नका, कारण तुमचं आयुष्य फक्त तुमचं नसतं, ते तुमच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या माणसांचंही असतं. एकदा तरी आई-वडिलांच्या चेहर्‍याकडे पाहा त्यांच्या डोळ्यांतील प्रेम तुम्हाला पुन्हा जगायला शिकवेल!

A life ruined by one mistake…

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

13 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

13 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

13 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

13 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

14 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

14 hours ago