नाशिक

गावठी कट्टा, कोयता, चॉपर बाळगणारा एकजण पंचवटी पोलिसांकडून जेरबंद

पंचवटी : प्रतिनिधी
दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी पाटाच्या पुलावर हिरावाडी बाजूकडे जाणार्‍या रस्त्यावर गावठी कट्टा, कोयता व चॉपर बाळगणार्‍या एका 28 वर्षीय तरुणास पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने कामगिरी केली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी कट्टे व हत्यार बाळगणार्‍यांच्या विरोधात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार कैलास शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा) तसेच कोयता असे वज्रेश्वरी पाटाच्या पुलावर, हिरावाडी बाजूकडे जाणार्‍या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व त्यांच्या टीमने सापळा रचून त्यास पकडले. ईश्वर राजेंद्र गुरगुडे (वय 28, रा. शितळादेवी मंदिराजवळ, दुरगुडे चाळ, शिवतेज बंगलो, रामवाडी, पंचवटी) असे नाव आहे. त्याच्याकडून 31 हजार 700 रुपयांचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, रिकामी मॅगझीन व एक जिवंत काडतूस व धारदार पाते असलेला कोयता, धारदार चॉपर असा मुद्देमाल मिळाला. त्याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीवर पंचवटी, भद्रकाली, मुंबई नाका व सरकारवाडा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

A man carrying a village axe, scythe, and chopper was arrested by Panchavati police.

 

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago