पंचवटी : प्रतिनिधी
दिंडोरी रोडवरील वज्रेश्वरी पाटाच्या पुलावर हिरावाडी बाजूकडे जाणार्या रस्त्यावर गावठी कट्टा, कोयता व चॉपर बाळगणार्या एका 28 वर्षीय तरुणास पंचवटी पोलिसांनी जेरबंद केले. पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाने कामगिरी केली आहे.
शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर गावठी कट्टे व हत्यार बाळगणार्यांच्या विरोधात पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्याअनुषंगाने पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हेशोध पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार कैलास शिंदे यांना मिळालेल्या माहितीनुसार एक संशयित त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल (गावठी कट्टा) तसेच कोयता असे वज्रेश्वरी पाटाच्या पुलावर, हिरावाडी बाजूकडे जाणार्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व त्यांच्या टीमने सापळा रचून त्यास पकडले. ईश्वर राजेंद्र गुरगुडे (वय 28, रा. शितळादेवी मंदिराजवळ, दुरगुडे चाळ, शिवतेज बंगलो, रामवाडी, पंचवटी) असे नाव आहे. त्याच्याकडून 31 हजार 700 रुपयांचा देशी बनावटीचा गावठी कट्टा, रिकामी मॅगझीन व एक जिवंत काडतूस व धारदार पाते असलेला कोयता, धारदार चॉपर असा मुद्देमाल मिळाला. त्याच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास अटक करण्यात आली आहे. पकडण्यात आलेल्या आरोपीवर पंचवटी, भद्रकाली, मुंबई नाका व सरकारवाडा पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.
A man carrying a village axe, scythe, and chopper was arrested by Panchavati police.