अग्रलेख

इबोलाचा नवा अवतार

इबोला नावाच्या विषाणूने आफ्रिकन देशांना विशेषतः काँगोला ग्रासले आहे. हा विषाणू नवनव्या रूपात प्रकट होत आहे. त्याच्या अलीकडच्या अवताराला बुंडीबुग्यो नाव देण्यात आले आहे. इबोलाचा हा अवतार प्राणघातक असून, जागतिक आरोग्य संघटनेने त्याची दखल घेऊन जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जगभर या विषाणूची दखल घेण्यात आली आहे. भारत सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे. कोरोनाच्या अनुभवातून खबरदारी घेणे भागच आहे. भारतात संशयित रुग्ण आढळले; परंतु एकही पॉझिटिव्ह निघाला नाही, ही दिलासादायक गोष्ट असली, तरी खबरदारी घेणे भाग आहे. आफ्रिकन देशांतून आलेल्या काही प्रवाशांमध्ये इबोलाची संशयास्पद लक्षणे आढळल्याने खळबळ उडाली होती. युगांडाहून आलेल्या दोन प्रवाशांना खबरदारी म्हणून आयसोलेशनमध्ये (विलगीकरणात) ठेवण्यात आले होते. पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केलेल्या तपासणीत त्यांचे अहवाल पूर्णपणे निगेटिव्ह आले. काँगोतून आलेल्या गुजरातच्या एका व्यापार्‍याला ताप आल्याने त्याला अहमदाबादच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुदैवाने त्याचीही चाचणी निगेटिव्ह आली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळांवर, विशेषतः मुंबई, दिल्ली, बेंगळुरू येथे हाय अलर्ट (अतिदक्षता) जारी केला आहे. काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान यांसारख्या इबोलाग्रस्त देशांतून येणार्‍या प्रत्येक प्रवाशाचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची माहिती आणि आरोग्याची स्थिती फॉर्मद्वारे देणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रभावित देशांतून आलेल्या प्रवाशांना लक्षणे नसली, तरी 21 दिवस त्यांच्या आरोग्यावर देखरेख ठेवली जात आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आरोग्य यंत्रणेचा आढावा घेऊन विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. संशयित रुग्ण आढळल्यास तातडीने उपचार करण्यासाठी मोठ्या सरकारी रुग्णालयांमध्ये विशेष आयसोलेशन वॉर्ड तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांसाठी जागतिक दर्जाच्या पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट (पीपीई) म्हणजे वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचे तांत्रिक निकष निश्चित करण्यात आले आहेत. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांत अत्यंत आवश्यक काम नसल्यास प्रवास न करण्याचा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. दरम्यान, भारतात 28 ते 31 मे 2026 या काळात नवी दिल्लीत होणारे भारत-दक्षिण आफ्रिका शिखर संमेलन सुरक्षेचा उपाय म्हणून पुढे ढकलण्यात आले. आफ्रिकन देशांमधील आरोग्य आणीबाणी पाहता अनेक देशांचे प्रमुख या संमेलनाला उपस्थित राहू शकणार नव्हते. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या संमतीने हे संमेलन पुढे ढकलण्यात आले. भारतात सध्या इबोलाचा किंवा त्याच्या नवीन अवताराचा कोणताही धोका नाही; परंतु सरकार कोणतीही जोखीम स्वीकारण्यास तयार नाही. इबोला हा काही नवीन विषाणू नाही. सन 1976 सालीच त्याचा उद्रेक झाला होता. इबोला कोरोनाच्या आधीपासून असला तरी त्याचा बुंडीबुग्यो अवतार नवीनच आहे. आजच्या परिस्थितीत एखाद्या नवीन विषाणूचे नाव समोर आले की, आपल्यासमोर येतो तो कोरोना महामारीचा काळ. त्यावेळी घेतली गेलेली काळजी, रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन बेड्स, रुग्णांच्या नातेवाइकांची धावाधाव, विलगीकरण, स्वतंत्र कक्ष, रुग्णाजवळ जाण्याची भीती, लॉकडाउन आणि निर्बंध अशा कितीतरी गोष्टी सहज आठवतात. आफ्रिका खंडात काँगो नावाचे दोन वेगळे देश आहेत. हे दोन्ही देश एकमेकांच्या शेजारी असून, त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी त्यांची अधिकृत नावे किंवा त्यांच्या राजधानीचा वापर केला जातो. काँगो प्रजासत्ताक (रिपब्लिक ऑफ द काँगो) याची राजधानी ब्राझाव्हिल आहे. या देशाला अनेकदा काँगो-ब्राझाव्हिल म्हटले जाते. हा भाग पूर्वी फ्रान्सची वसाहत होता. दुसरा देश आहे, काँगो लोकशाही प्रजासत्ताक (डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो). या देशाची राजधानी किन्शासा आहे. या देशाला काँगो-किन्शासा किंवा डीआर काँगो म्हणून ओळखले जाते. हा भाग पूर्वी बेल्जियमची वसाहत होता आणि पूर्वी याला झैरे नावाने ओळखले जात होते. हा देश आफ्रिकेतील क्षेत्रफळाने दुसरा सवार्ंत मोठा देश आहे. दोन्ही काँगो देशांमधून काँगो नदी वाहते. त्यावरूनच दोन्ही देशांना हे नाव मिळाले. याच काँगोत इबोलाचा नवीन अवतार आढळला, त्याला बुंडीबुग्यो नाव देण्यात आले आहे. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगोमध्ये इबोला नदीच्या परिसरात पहिल्यांदा सापडलेल्या विषाणूला
इबोला नाव देण्यात आले. काँगो, युगांडा व दक्षिण सुदान या दक्षिण आफ्रिका खंडातील पश्चिमेकडे वसणार्‍या देशांतील इबोलाची नवीन साथ लक्षात घेऊन भारत, अमेरिकेसह जगभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

A new incarnation of Ebola

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

राज्यसभेची उमेदवारी भुजबळ यांच्याऐवजी या नेत्याला, तटकरे यांनी दिली माहिती

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या जागेवर मंत्री छगन भुजबळ यांना संधी दिली जाईल,…

6 hours ago

पावसाच्या सरींसोबतच घरोघरी लोणचे बनवण्याची लगबग

बाजारात गावरान कैर्‍यांची धूम, महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले दिंडोरी : प्रतिनिधी पहिल्या मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने…

2 days ago

त्र्यंबकेश्वरमध्ये अनिर्बंध लॉजिंग बांधकामांना वेग

कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरक्षेचे नियम धाब्यावर; यंत्रणांचे सोयीस्कर दुर्लक्ष त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असल्याने…

2 days ago

‘धाडसत्र’ केवळ ‘दिखावा’ ठरू नये…

ज्याची ’सांस्कृतिक राजधानी’ आणि ’विद्येचे माहेरघर’ असे संबोधल्या जाणार्‍या पुणे शहराचा गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढतच…

2 days ago

राजं छत्रपती झालं!

सहा जून ही तारीख भारतीय इतिहासाला कलाटणी देऊन सुवर्णाक्षरात कोरली गेलेली आहे. तीन शतकांच्या पारतंत्र्यानंतर…

2 days ago

सौर कृषिपंपांमध्ये महाराष्ट्राची विक्रमी झेप

देशात सर्वाधिक 10 लाखांचा टप्पा गाठला नाशिक : प्रतिनिधी सौर कृषिपंपांमध्ये विश्वविक्रम करणार्‍या महाराष्ट्राने सर्वाधिक…

2 days ago