डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निकाल

– कुबेर जाधव

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला आहे. जाहीर करण्यात रिझल्टनुसार, एकूण बसलेल्या 1,757
उमेदवारांपैकी एकट्या बिहारमधील
उमेदवारांनी एकदा इतिहासाची पुनरावृत्ती करत 1,123 बिहारी आयएएस अधिकारी झाले. देशपातळीवर बसलेल्या 1,757 पैकी 1,123 उत्तीर्णझालेले बिहारी उमेदवारा सोडून उर्वरित भागातून फक्त 634 उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत.
आपली मुले केव्हा स्पर्धा परीक्षेत बाजी मारणार? हा प्रश्न उपस्थित होतो. आयएएस परीक्षेत यशस्वी होण्यासाठी ध्येयवेडे कधी होणार? आपली मुलं परीक्षा आली की, चार-सहा महिने अभ्यास करणार. इतर वेळी महिनाभर, दहीहंडी सराव, पंधरा दिवस गणेशोत्सव, दहा दिवस नवरात्रोत्सवात सहभागी होत आणि वर्गणी गोळा करणार, दहा दिवस साईबाबांची पालखी, महिनाभर पंढरपूरची वारी, मधेच पावसाळी पिकनिक, किल्ले मोहीम, हंगामी क्रिकेट सामने, मग कबड्डी, कुस्तीचे सामने आणि निवडणुका आल्या की राजकीय पक्षाच्या सतरंज्या आणि जोडे उचलायला हजर? पुढे राजकीय पूर्वग्रह मनात साठवत अकारण वाद घालत बसणार! राजकीय पुढार्‍यांची तळी उचलत राहणार!
दिवसभर बाप रानात राबतो, नाहीतर छोटी-मोठी नोकरी करतो. रिक्षा व टॅक्सी चालवतो. आपला दिवट्या चिरंजीव काय करतो? कुठे जातो? अभ्यास करतो का? याकडे आपलं लक्ष नसतं. पायात हजाराचे बूट, दोन हजारांची जीन्स, पंधराशेचा टीशर्ट, 200-250 रुपयांचा सेंट मारून नाक्यावर भाईगिरी करणार, हीरोसारखा भांग पाडणार, भरपूर बुद्धिमान आणि हुशार असूनही कमवायची. मात्र अक्कल नाही, त्यामुळे अपयशी होणार आणि घरच्यांना भार सहन करावा लागणार,.. त्यांच्या डोक्यात आज काय वर्धापनदिन, उद्या काय नेत्याचा किंवा त्याच्या मुलाचा वाढदिवस, त्याचे बॅनर, झेंडे, परवा काय आंदोलनात सहभाग, कधीकधी मार्‍यामार्‍या, भानगडी, मग काय चार-आठ दिवस पोलिस कस्टडी, नंतर वर्षे-दोन वर्षे कोर्टाची वारी… आला ना राग तुम्हाला? कारण आम्ही मराठी बहुजनांची लेकरं आहोत तसे स्वाभिमानी आहोत. वाकेल, पण मोडणार नाही, हा आमचा बाणा आहे. अजूनही वेळ गेली नाही. सुधरा पोरांनो, पुढे भविष्य खूप आहे. तुमच्या अशा वागण्याने नाना पाटेकरसुद्धा हतबल झालेले आपण पाहिले. तुम्हाला हे बोलणं मनाला टोचेल, बोचेल, झोंबेल असेच लिहिले गेले आहे.तुम्हाला राग आला तरी चालेल. एखाद्या राजकीय संघटनेचा कार्यकर्ता नाही तर यूपीएससी, एमपीएससी परीक्षेत खडतर अभ्यास करून अधिकारी बना!

A result that serves as a sharp wake-up call

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *