मृतांची संख्या सात
दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील मुळाणे येथील भीषण ट्रॅक्टर ट्रॉली-कार अपघातात काल गुरुवारी (दि. 2) सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या अपघातात जखमी झालेल्या सात वर्षीय गणेश बापू पवार या बालकाला उपचारार्थ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला असून, मृत्यूची संख्या सात झाली आहे.
मार्कंडेय गडाच्या पायथ्याशी असलेल्या मुळाणे बारीत दोन ट्रॉलीसह जात असलेला मजुरांच्या ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला व ट्रॉली समोरून येणार्या अल्टो कारवर उलटली. यात जळगाव जिल्ह्यातील लहान मुलीसह दोन पुरुष व तीन महिला असे एकूण सहा जण ठार झाले, तर अन्य 15 जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून नाशिक येथे हलविण्यात आले होते. यापैकी सात वर्षीय बालकाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.