एक सिग्नल.. माणुसकीचा

नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्याची गडबड आणि त्या गडबडीत आडवा येणारा तो म्हणजे सिग्नल काहींसाठी ती अडवणूक तर काहींसाठी एक छोटासा विश्रांतीचा क्षण. काही जणांना हा सिग्नल म्हणजे फार मोठी शिक्षा वाटतो हा का बर रस्त्यात आडवा येतो म्हणून बरेच जण त्याला तोडून निघूनही जातात.
वास्तविक, काही नियमावली या आपल्याला सक्तीच्या वाढल्या तरी त्या आपल्यासाठी खूप हितकारक आहेत. सिग्नल हा फक्त वाहनांची नियमित सुरळीत साखळी ठेवण्यासाठीच नाही तर अपघात वाचवण्यासाठी आपला जीव वाचवण्यासाठी केलेला प्रयोग आहे, मात्र यात बर्‍याच जणांना आपले हित न दिसता वेळ घालवणारी ही प्रक्रिया वाटते.
मी ही दररोज सारखी त्यादिवशी गडबडीतच होते नेहमीसारखा सिग्नल लागला की ती पळत येणारी लहान मुलं धावत आली आणि गजरा आणि फुगे विकण्यासाठी लोकांना विचारणा करू लागले. त्यातला एक लहान मूल पडलं सिग्नल सुटण्याआधी तो सावरणार की नाही, या गोष्टीने जणू माझा जीव खूप अस्वस्थ झाला.
रोज नियमितपणे आपल्या आई-वडिलांसोबत सिग्नलवर काम करणारी ती लहानशी लेकरं कुठल्याही वाहनाला घाबरत नाहीत आणि दहा पाच रुपये कमावण्यासाठी दिवसभर त्या सिग्नलवर पावसात आपल्या सामानाची विक्री करत असतात. खरंतर कधी कधी ऑफिसच्या गडबडीत या मुलांचा असं येऊन खूप वेळा विचारणं खूप त्रासदायक वाटतं. असं वाटतं की या गोष्टीची गरजच नाहीये. ती आपल्याला हे येऊन चार वेळा विचारतात आणि एके दिवशी खरंच मला सणाच्या निमित्ताने गजर्‍याची गरज होती आणि मला त्या सिग्नलला त्या दिवशी लहान मूल दिसलंच नाही जे नेहमी मला ऑफिसला जाताना गजरा घेणारे का, अशी विचारणा करायचा, पण ऑफिसला कोण गजरा लावून जातो म्हणून मला त्या गोष्टीचा फार थोडा वैताग यायचा. पण मात्र सणाच्या आदल्या दिवशी मला अगदी उत्सुकता होती आणि मला त्याच दिवशी गजरा न मिळाल्याने माझा हिरे मूड झाला आणि असं त्याच दिवशी नाहीतर दुसर्‍या दिवशी सुद्धा घडलं आणि आणि त्याच दरम्यान मला एकदा जाणवलं की, तो लहान मुलगा एकदा गजरे घेऊन पळत असताना पडला आणि त्याला पायाला इजा झाल्यामुळे तो त्या दिवशी गजरे विकण्यास उभा नव्हता.
त्यावेळी माझ्या मनात एक अगदी अस्वस्थ करणारा विचारायला आपण कितीही सुशिक्षित असलो तरी कधीतरी घाईत आणि सिग्नलला कंटाळून आपण सिग्नल तोडून निघून जातो आणि त्याच वेळी जर ही लहान लेकरं रस्ता ओलांडून गजरा विकण्यासाठी किंवा काही वस्तू विकण्यासाठी येत असली आणि त्यांच्यासोबत काय अपघात घडला तर हे किती चुकीचे होणार?
कुठलीही कंप्लेंट कोर्टकचेरी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. एकतर आपल्या उदरनिर्वाहासाठी जीवावर उदार झालेली ही लोकं दिवस-रात्र मेहनत करतात. त्यात त्यांच्यासारख्या कोणाला असं काही खर्चिक काम येणं न झालेलंच बरं..
काहीजण यावर प्रश्न उठवतील एक तर काही ठिकाणी अतिक्रमण करून हे लोक झोपड्या बांधतात आणि आपला उदरनिर्वाह भागवतात आणि त्यासाठी हे सिग्नलवर धडपड करतात तर त्यात माणुसकी माणुसकी दाखवण्याचा काय विषय..?
प्रत्येक माणसाला आपले पोट भरण्यासाठी एक उदरनिर्वाहाचे साधन शोधावा लागते, तो आपल्या कृतीप्रमाणे कधी शिक्षण घेतो. कधी व्यवसाय थाटतो तर त्या पलीकडे जाऊनही काही मार्ग काढता.े तसाच काही लोकांनी काढलेला मार्ग म्हणजे सिग्नल वरचा व्यवसाय आता त्यामागे जर सरकारी नियमांचा विचार केला तर काही ठिकाणी या गोष्टीमुळे अतिक्रमण होते असे म्हटले जाते. परंतु माझा आजचा विषय जर लक्षात घेतला तर मला असं म्हणायचंय या देशात अशा कितीतरी गोष्टी ज्यामुळे नुकसान होत असेल, बेकारी वाढत असेल, भ्रष्टाचार होत असेल, मी या सर्व गोष्टींचा विचार करत बसला तर कसं व्हायचं, सगळ्याच तथ्य नियमांच्या गोष्टी कोणाच्या उदरनिर्वापर्यंतच का येऊन थांबतात. मला एकंदरीत असे म्हणायचे की हा सिग्नल पाळताना कधी जर तुम्ही घाई करत असाल थोड्या क्षणासाठी नियम पाळत नसाल तर आपल्या जीवा इतका स्वतःच्या जीवा सोबत दुसर्‍याच्या जीवालाही तुम्ही इजा पोहोचवत आहात धोका पोहोचवत आहात.
हे जग खूप सुंदर आहे या जगात कोणाला थोडं जरी सुख देता आलं ना तरी आपण खरे समाधानी आणि प्रामाणिक माणसं ठरू अगदी माणुसकीच्या नात्याने म्हणून एकदा कधीतरी या सिग्नलवर थांबलेल्या मुलांसाठी आपल्या उदरनिर्वाहासाठी धडपड करणार्‍या लेकरांकडून काहीतरी वस्तू विकत घेऊन बघा. त्यांना प्रेमाने कुरवाळून बघा आणि त्यांची या तारांबळी चुकूनही गाडी वेगाने नेऊन कधी त्यांच्यासोबत आणि आपल्या सोबत चुकीचे होईल असे निर्णय घेऊ नका.
अति घाई संकटात नेई
विचारपूर्वक चालवू या वाहन
आपल्या सोबत इतरांच्याही जीवाचं करूया रक्षण…

A signal.. of humanity.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *