विचारांचे व्दंव्द मांडणारे चेटुकवार
नाशिक : प्रतिनिधी
61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत रविवारी (दि.27)रोजी चेटुकवार या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले.प्रत्येक माणसाच्या मनात असणाऱ्या चांगल्या आणि वाईट विचारांमध्ये कायमच व्दंव्द सुरु असते. त्यावेळी जो विचार त्या व्यक्तीचा ताबा घेतो, त्यानुसार तो व्यक्ती वागतो.चांगल्या आणि वाईट विचारांचे तरंग प्रत्येकाच्याच मनात उसळ्या मारत असतात. जेव्हा माणसाच्या मनाचा ताबा वाईट विचार घेतात, तेव्हा तो वाट्टेल ती दुष्कृत्ये करतो. अनेकदा स्वार्थाने आंधळा होऊन अगदी हीन पातळीवर जाऊन कृष्णकृत्य करतो. सोळाव्या शतकात शेक्सपिअरला दिसलेल्या माणसांसारखीच माणसे एकविसाव्या शतकातही आहेत. माणसाच्या मनातील विचारांची आंदोलनं, त्याची स्वप्न, त्याच्यावर आलेले चांगले-वाईट प्रसंग यातून माणसं कल्पनेतील एक जग निर्माण करतात. त्याबाबत एका राजाच्या कथेतून सारं काही गुंफत वास्तव मांडण्यात आले.
विल्यम शेक्सपिअरच्या द टेम्पेस्ट या नाटकाचे प्रा. दिलीप जगताप भाषांतर करत ‘चेटुकवारं’ हे लिहले .नाटकाचे दिग्दर्शन राजेश टाकेकर यांनी केले.नाटकात निर्मिती प्रमुख म्हणून रवींद्र ढवळे, नंदकुमार देशपांडे, नेपथ्य चंद्रकांत जाडकर, संगीत विक्रम गवांदे, रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा हरीकृष्ण डिडवाणी आणि प्रकाशयोजनेची विनोद राठोड यांनी केले. नाटकात जय शुक्ल , डॉ. सोनाली गायकवाड, वैष्णवी ताम्हणकर ,ऋषिकेश शेटे, रवींद्र ढवळे ,विवेकानंद भट, अरूण भावसार ,प्रबुद्ध मागाडे ,सचिन दलाल, लक्ष्मीकांत पवार, हरिकृष्ण डिडवाणी , ओम शेवाळे ,हरीश परदेशी, मुरलीधर जगताप , संजय साळवे, केदार रत्नपारखी, राजेश टाकेकर यांनी अभिनय केला.
प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…
महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…
कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…
सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…
पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…
नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्या…