Categories: नाशिक

रहस्याच्या  रंगाची उधळण फेंट

नाशिक : प्रतिनिधी

61 व्या राज्य नाट्य स्पर्धेत काल गुरूवार (दि.8)रोजी फेंट हे  चैतन्य सरदेशपांडे लिखीत आणि विक्रम क्षीरसागर दिग्दर्शित फेंट हे नाटक सादर करण्यात आले.फेंट हे नाटक रहस्यमय असुन प्रेक्षकाला खिळून ठेवणारे आहे. तसेच नाटकात दाखवण्यात आलेले रंग हे रंग नसुन  समाजातील विविध घटकांचे प्रतिनिधीत्व करतात.

वकिली व्यवसाय करत असलेल्या रॉय रंगाच्या शोधात आहे .त्याची लाला नावाची बायको ही एक समाजसेविका आहे. ती त्याला वेळोवेळी वेगवेगळ्या रंगाचे दुष्परिणाम सांगत असते. त्याचवेळी रंगारीचा खून होतो. तो खून हा फक्त खून असतो की त्यामागे घातपात ..हे रस्मयरित्या नाटकात मांडण्यात आले आहे.  रंगार्याच्या खुनाच्या  संशयाची सुई रॉय लाला की  आमदार काळे  जाते. या सगळ्यांचा उलगडा म्हणजे फ्रेंड हे नाटक.नाटकाचे पार्श्वसंगीत प्रितीश कामत ,वैभव जैस्वाल, प्रकाशयोजना आदित्य रहाणे ,रंगभूषा साक्षी गोयल, वेशभूषा श्रृती कापसे,नेपथ्य युवराज माळी ,रंगमंच व्यवस्था शुभम चव्हाण ,मनीष गायकवाड यांनी केले.सानिका गायकवाड,अमोल बागुल,विक्रम क्षीरसागर,युवराज माळी ,श्रृती कापसे ,वंदन वेलदे यांनी केले.

आज सादर होणारे नाटक : उदकशांत – कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय,सिडको

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

2 hours ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

2 hours ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago