जीवन सुंदर आहे, ते जगण्याची रीती माणसाला उमगायला हवी….जीवनभर मनुष्य शिकतच असतो, अनुभवांनी समृद्ध होत असतो…काहींसाठी आयुष्य जटिल तर काहींसाठी अगदीच सहज असतं… ते आपल्या आपल्या मानण्यावर आहे….
एक आजोबा मला नेहमी नजरेस पडतात… वय त्यांचं बरंच झालेलं… पाहताक्षणी लक्षात येते…त्यांच्याकडे असलेली एक जुनी सायकल.. आणि त्यावर भलीमोठी एक किटली…. रोज फिरताना पाहिलं… मग लक्षात आलं की हे आजोबा दूध घेऊन घरोघरी पोहोचवतात…. सहज एक दिवस विचारलं बाबा, अहो वय झालं… सायकल ही जुनी झाली आता.. थोडी तिला ही सुट्टी द्या… एवढी मोठी किटली घेऊन फिरतात आता आराम करायचा ना….थोडा वेळ विचारात पडले…कदाचित माझं म्हणणं पटल असावं त्यांना….पण त्यावर आजोबांचे प्रतिक्रिया मला आवर्जून ऐकायची होती…. कारण जुनी माणसं म्हणजे अनुभवांनी व्यापक झालेलं जीवन असतं…. अनुभवांची शिदोरी घेऊन ते परिपक्व झालेले असतात….हा लेकी खर आहे तुझं म्हणणं…आता मी उत्सुक होते पुढचे शब्द ऐकण्यासाठी… आजोबा म्हणाले कष्ट करण्याची आधीपासूनची सवय पोरी… त्यामुळे आता सर्व अलबेल असताना ही शांत बसवत नाही… आणि वय झालं म्हणून इतरांसारखा मी पडून नाही, मला कधी गोळी का औषीध काहीच माहीत नाही… कारण मी बसून राहत नाही सायकल चालवून हळूहळू का होईना हालचाल करतो … त्यामुळे अगदीच सुस्त जीव नाही माझा…. दूध वाटतो सर्वांना आनंदाने, सर्व वाट पाहत असतात… चौकशी करतात, तेच आपुलकीचे शब्द ऐकायला गोड वाटतात… रोज बाबा आले नाही म्हणून वाट पाहतात… आता मी घरीच बसू तर हा आनंद कुठे मिळेल सांग मला… कधी तर निवांत राहिलो तर घरातील वृद्ध मंडळी माझ्यासारखी जवळ येऊन बसतात… हक्कानं चहासाठी बोलावतात.. मनातलं व्यक्त करतात… आम्ही म्हणजे समसुखी समदुःखी… असं म्हणून आनंदाने गप्पा मारतो… बस थकवा निघून जातो बाई…
आजोबा बोलत होते आणि आजोबांच्या शब्दांतून व्यक्त होणारा आनंद मी पाहत होते… म्हणजे काय ते जीवन, आणि त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींतून असणारा आनंद ते ओळखून, ते क्षण जगतात… अगदी आयुष्याच्या उतरणीच्या क्षणांकडे प्रवास असताना ही…. केवढ कौतुक आहे….
आम्ही मात्र छोट्या छोट्या गोष्टींत तक्रार करण्यात आयुष्य घालवण्यात व्यस्त आहोत… खरा आनंद काय हे आम्ही विसरूनच गेलो आहे… ही जुनी पिढी पाहिली की वाटत यांनी खर जीवन अनुभवलं… तेवढ ऐकून आजोबा म्हणले चल पोरी आता निघायला पाहिजे.. माझी मालकीण वाट पाहत बसली आसल बाई… हो म्हणलं बाबा खूप भारी वाटलं बर ऐकून तुम्हाला… बाबांनी सायकल काढली आणि निघाले परतीला… मग आपण कधी आनंदाची व्याख्या समजून घेणार आहोत…?
A Storehouse of Joy
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…