नाशिक

शहरात हजार वाडे धोकेदायक; महापालिकेच्या नोटिसा

नाशिक : प्रतिनिधी
शहरातील धोकादायक वाड्यांना महापालिका प्रशासन पावसाळ्यच्या पार्श्वभूमीवर नोटिसा बजावत असते. दरम्यान, धोकादायक वाडे असूनही भाडेकरू, रहिवासी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. बुधवारी (दि.1) मेनरोड परिसरातील वाडा कोसळल्याची घटना घडली. त्यानंतर शहरातील धोकादायक वाड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याआधी जुन्या नाशिकसह पूर्व विभागात वाडे पडल्याच्या घटना घडल्याने खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका प्रशासनाने धोकेदायक वाड्यांना नोटिसा बजावत सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, रहिवासी वाडे सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींचा सर्व्हे केला होता. त्यात या इमारती व वाडे कधीही कोसळू शकतात, त्यामुळे खाली कराव्यात, अशा नोटिसा महापालिकेने मे महिन्यात इमारत मालकांना बजावल्या होत्या. मात्र, त्यापैकी कोणीही या नोटिसींची दखल घेतली नाही. पावसाळा सुरू असून, अशा परिस्थितीत जीर्ण व धोकादायक इमारती कोसळण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी महापालिकेने शहरातील हजाराहून अधिक इमारत मालकांना नोटीस बजावून या इमारती तत्काळ रिकाम्या कराव्यात किंवा त्याची दुरुस्ती करावी, अशी नोटीस बजावली आहे.
महापालिका धोकादायक इमारतींच्या मालकांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 265 (अ) अन्वये नोटीस बजावते. 1950 मधील तरतुदीनुसार नोटिसा दिल्यानंतर होणार्‍या जीवित किंवा वित्तहानीस इमारत मालक जबाबदार असतो. त्यात दंडात्मक शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. शहरातील जुने नाशिक, पंचवटी, नाशिकरोड, देवळालीगाव, सातपूर या गावठाणांमध्ये नागरिक आजही जुनी घरे, इमारती आणि वाड्यांमध्ये राहत आहेत. इमारती व वाडे धोकादायक असूनही नागरिक त्यात वास्तव्याला आहेत.

विभागवार धोकादायक वाड्यांची माहिती
नाशिक पश्चिम –  600
पंचवटी             –  198
नाशिक पूर्व       – 117
सातपूर             –  68
नवीन नाशिक   –  25
नाशिकरोड       –  69
एकूण              –  1,077

A thousand *wadas* in the city are dangerous; Municipal Corporation issues notices.

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago