नाशिक

बंदी असूनही प्लास्टिकचा सर्रास वापर

प्लास्टिक पिशवीमुक्त दिन : वर्षभरात चाळीस लाख दंड वसूल

नाशिक : देवयानी सोनार

प्लास्टिकच्या कॅरीबॅगचे दुष्परिणाम लक्षात घेऊन प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यावर बंदी असली, तरी शहरात सर्रासपणे कॅरीबॅगचा वापर केला जात आहे. हा प्लास्टिक कचरा पर्यावरण आणि मानवी आरोग्यासाठी घातक ठरत असला तरी, वापर करणार्‍यांची अवस्था कळतंय पण वळत नाही, अशी आहे.
दरवर्षी 3 जुलै रोजी प्लास्टिक पिशवीमुक्त दिन साजरा केला जातो. पर्यावरण, मानवी आरोग्य आणि जैवविविधतेवर होणारे प्लास्टिकचे दुष्परिणाम लक्षात घेता हा दिवस केवळ साजरा करणे नसून, प्रत्येकाने सवयीत बदल करण्याची गरज आहे.

वर्षभरात 777 प्रकरणांमध्ये दंड
नाशिक महानगरपालिकेने सिंगल-यूज प्लास्टिकविरोधात सातत्याने मोहीम सुरू ठेवली आहे. जानेवारी 2025 ते जून 2026 या कालावधीत 777 प्रकरणांमध्ये 39 लाख 75 हजार 1 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नियमित तपासणी, विशेष पथकांची कारवाई आणि जनजागृतीद्वारे प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे.

जनावरांचा जीवही धोक्यात

एकदाच वापरल्या जाणार्‍या (सिंगल-यूज) प्लास्टिकचा वापर हा आज पर्यावरणासमोरील सर्वांत मोठी समस्या आहे. प्लास्टिक सहज नष्ट होत नाही. ते शेकडो वर्षे जमिनीत तसेच राहते. त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते, नद्या-नाले तुंबतात. पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते आणि जनावरांच्या पोटात प्लास्टिक गेल्याने त्यांचाही जीव धोक्यात येतो. प्लास्टिक कचरा रस्त्यावर किंवा मोकळ्या जागेत न टाकता घंटागाडीत देणे हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी आहे. अनेकदा महापालिकेने ओला-सुका कचरा वेगळा करण्याबाबत वारंवार जनजागृती करण्यावर भर देत असते. ओला, सुका कचर्‍याबाबत कठोर अंमलबजावणीसाठी वेळोवेळी आदेश देण्यात येतात, परंतु नागरिकांकडून कायमच आदेशाचे उल्लंघन होते. परिणामी, प्लास्टिकमुळे माणसांसह जनावरे, पर्यावरणावर परिणाम होतोे.

परिस्थिती जैसे थे!

पावसाळा आला की, प्लास्टिक वापराबाबत ऊहापोह केला जातो. रस्ते, नदी-नाल्या, गटारी तुंबल्या की प्लास्टिक कसे हानिकारक आहे, याबद्दल बोलले जाते; परंतु वर्षानुवर्षे प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या, रॅपर, इतर प्लास्टिक वस्तू वापरताना हा विचार केला जात नाही.किराणामालाच्या, तेलाच्या, भाजीच्या प्लास्टिक पिशव्यांतून सामान आणताना याचा विचारच होत नाही. अनेक सामाजिक संस्था तर भाजी मार्केटमध्ये जाऊन नागरिकांना कापडी पिशवी मोफत वाटूनही पुन्हा परिस्थिती जैसे थेच होत असल्याचे चित्र आहे.

Widespread use of plastic despite ban

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

15 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

15 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

15 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

15 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

16 hours ago