भीक मागण्याचा अनोखा फंडा

धार्मिक स्थळी शालेय साहित्य मागून केले जाते भावनिक

नाशिक : प्रतिनिधी

पर्यटन किंवा धार्मिकस्थळी आलेल्या भाविक , पर्यटकांना शालेय पुस्तके , दप्तर , वही , पेन आदी साहित्य मागत भावनिक भीक मागितली जात आहे . त्यामुळे फिरण्यास येणाऱ्या नागरिकही या भावनिकतेला बळी पडत असले तरी त्यातून मनस्ताप सहन करावा लागत आहे . शैक्षणिक साहित्य खरेदी करून दिल्यानंतर ही मुले मिळालेले पुस्तके , दप्तर , वही , पेन दुकानदारांना किंवा इतरांना विकून पैसे मिळवित असल्याचे चित्र आहे .
शहर आणि राज्यातील पर्यटनस्थळी त्र्यंबकेश्वर , पांडवलेणी , वणी , सापुतारा , शिर्डी , गडकिल्ले आदी ठिकाणी पर्यटक , भाविक
आहे . मोठ्या प्रमाणावर येत असतात . कोरोना उतरणीला लागल्यामुळे पर्यटनाचा जोर वाढला वाढला गेल्या दोन वर्षांत पर्यटन किंवा देवदर्शनासाठी बाहेर पडता आले नव्हते . आता जनजीवन पूर्वपदावर येत असताना उन्हाळी सुटीमुळे अनेक नागरिक पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत . देवदर्शन किंवा निसर्गरम्य ठिकाणी पूजासाहित्य किंवा त्या ठिकाणचे वैशिष्ट्ये असलेल्या वस्तू पर्यटकांना विकण्यासाठी चढाओढ दिसून येते . त्यातून अनेकदा मनस्ताप होतो . लहान मुलांमार्फत भीक मागितली जाते . अनेकजण भूतदयेने दानधर्माच्या नावाखाली पैसे दान करतात . ही भीक मागणारी मुले किंवा स्त्री – पुरुष पैसे घेऊन व्यसन करतात . गुजराण करतात .
पर्यटन , धार्मिकस्थळी – लहानमुलांकरवी पैसे मागण्याचे प्रमाण जास्त आहे . त्याचा त्रास पर्यटकांना होतो . परंतु , याबाबत चाइल्ड हेल्पलाइनला कळविण्याचे प्रमाण अत्यल्प आहे . गरीब , व्यसनी , अपंग असलेली मुले कुटुंबातील वडिलांच्या व्यसन किंवा गरिबीच्या कारणांमुळे शहरात भीक मागताना सिग्नल , बसस्थानके , दिसतात . खेळणी , बगिचे , गर्दीच्या ठिकाणांवर येणाऱ्या जाणाऱ्यांकडून पैसे , अन्न मागून किंवा त्यांच्याजवळील गजरे , फगे आदी विकत घेण्यास भाग पाडून पैसे मिळवितात . सिग्नलवर अनेकदा लहान , गरीब मुलांना मदत म्हणून नागरिक त्यांच्याकडील वस्तू विकतही घेतात . मदत करतात . शालेय साहित्य पदरात पाडल्यानंतर परस्पर कमी किमतीत किंवा दुकानदारांना विकून पैसे मिळविले जात आहेत . अशा प्रकारामुळे पर्यटकही चक्रावले आहेत .

शहरात २८ तारखेला रेस्कू ऑपरेशन राबविले होते . त्यामध्ये ३६ मुले सापडली होती . त्यापैकी २२ जणांच्या पालकांनी महिला – बालकल्याण समितीत हजेरी लावली . त्यांच्या पालकांना समज देऊन बालके ताब्यात दिली . उरलेल्या चौदा बालकांची ओळख पूर्णतः पटलेली नाही अशांना बालगृहात ठेवण्यात आले . त्यातील आठ बालकांची ओळख पटवून पालक घेऊन गेले . असे रेस्कू ऑपरेशन वारंवार राबविणार आहे . त्यामुळे जनजागृती होईल आणि कोणी जाणीवपूर्वक असे करीत असेल तर अशांना चपराक बसेल . कोविड काळ सोडला तर वर्षातून तीन ते चार मोहिमा राबविल्या जातात . त्यातील अनेक बालके शालेय प्रवाहात आणले जातात .

– अजय फडोळ

( जिल्हा महिला व बालविकास अधिकारी )

बालकल्याण समितीकडे चाइल्डलाइन किंवा इतर कोणी तक्रार केली की मुलांना बालकल्याण समितीकडे सादर केले जाते . बालकल्याण समिती बालकाची माहिती घेते . अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणि पूर्णरचनेच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केला जातो . अनेकांना अशा बालकांची तक्रार किंवा त्यांच्याबाबतीत कोणाकडे घेऊन जावे याची माहिती नसते . अशावेळी चाइल्डलाइन हेल्पलाइन १०९८ ला फोन केल्यास तात्काळ मदत मिळू शकते .

 – शोभा पवार

( सदस्या , कल्याण समिती , नाशिक )

हेही वाचामनसे शहराध्यक्ष दिलीप दातीर तडीपार

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *