साप्ताहिक राशिभविष्य

दि. 25 ते 31 ऑक्टोबर 2026

मेष : जबाबदार्‍या वाढतील

या आठवड्यात चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. त्यामुळे आर्थिक आवक चांगली राहील. खर्चाचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. घरगुती गरजा किंवा वैयक्तिक खरेदीवर खर्च वाढू शकतो. विवाहित व्यक्तींनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. नोकरीच्या ठिकाणी नवीन जबाबदार्‍या मिळू शकतात. आपल्या कामातील कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल.

वृषभ : आर्थिक लाभ होतील

या सप्ताहात चंद्रभमणे अनुकूल आहेत. आर्थिक लाभ होतील.जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. गैरसमज दूर होण्यास मदत होईल. जोडीदाराचे सहकार्य मिळू शकते. करिअरच्या बाबतीत नोकरीत सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा फायदा होऊ शकतो. व्यावसायिकांना नवीन ग्राहक किंवा संपर्क जोडण्याची संधी मिळू शकते.

मिथुन : सावधगिरी बाळगा

या सप्ताहात चंद्रभ्रमणे प्रतिकूल आहेत. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. प्रेमसंबंधांमध्ये संवाद आणि समजूतदारपणा वाढवण्याचा ठरू शकतो. विवाहित व्यक्तींनी कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडताना जोडीदाराच्या भावनांचाही विचार करावा. नोकरीच्या ठिकाणी नवीन कल्पना मांडण्याची संधी मिळू शकते. आरोग्य सांभाळा.

कर्क : कामाचा व्याप वाढेल

या सप्ताहात ग्रहमान अनुकूल आहेत. या आठवड्यात आर्थिक नियोजनाला प्राधान्य द्यावे. घरातील गरजा किंवा कुटुंबाशी संबंधित कारणांमुळे खर्च होऊ शकतो. जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधल्यास परस्परांमधील विश्वास वाढेल. नोकरीत कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी योग्य नियोजन करावे.

सिंह : संततिसौख्य लाभेल

या सप्ताहात ग्रहमान अनुकूल असून, आर्थिक बाजू भक्कम होईल. आठवड्यातील सर्व दिवस चांगले आहेत. सध्या तुम्ही म्हणाल तीच पूर्व दिशा असेल. अगदी वेळेत काम पूर्ण होईल. व्यावसायिकदृष्ट्या आघाडी मिळवाल. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत योग्य ते निर्णय घेता येतील. मित्रपरिवाराकडून शुभेच्छा मिळतील. संततिसौख्य लाभेल. समाधान लाभेल.

कन्या : आर्थिक परिस्थिती सुधारेल

या सप्ताहात ग्रहमानाची साथ लाभणार असून, चंद्रभ्रमणे अनुकूल आहेत. आर्थिक परिस्थिती संमिश्र राहील. कामे व्यवस्थित पार पाडाल. इतरांचे मार्गदर्शन लाखमोलाचे ठरेल. व्यवसायात फायद्याचे प्रमाण चांगले राहील. नोकरदारवर्गाला आपले अधिकार प्राप्त करण्यासाठी वरिष्ठांशी बोलताना योग्य मुद्दे मांडावे लागतील. आरोग्य उत्तम राहील.

तूळ : सकारात्मक बदल

या सप्ताहात चंद्रग्रहाचे भ्रमण लाभदायक राहील. सकारात्मक बदल होतील. नोकरी करणार्‍या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे संकेत असून उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल आणि जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. मानसिक ताण टाळा.

धनु : आर्थिक लाभ

या सप्ताहात चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. या सप्ताहात आर्थिक परिस्थिती चांगली राहील. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील आणि रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणार्‍या व्यक्तींना आर्थिक लाभ मिळू शकतो. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहाराकडे लक्ष द्या.

मकर : आर्थिक लाभ होतील

या सप्ताहात चंद्रभ्रमणे चांगली आहेत. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि पदोन्नतीसंदर्भात सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती स्थिर राहण्याची शक्यता असली तरी मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

कुंभ : नोकरीत बदलाचे योग

या सप्ताहात चंद्राचे भ्रमण अतिशय लाभदायक राहील. नोकरी बदलण्याचा विचार करणार्‍या व्यक्तींना चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो, त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. प्रेमसंबंधांमध्ये जोडीदारासोबतचे मतभेद दूर होऊ शकतात. मानसिक शांततेसाठी योग, ध्यान आणि आवडत्या छंदांना वेळ देणे फायदेशीर ठरेल.

मीन : आनंद लाभेल

या सप्ताहात चंद्रभ्रमणे संमिश्र आहेत. आर्थिक आवक वाढेल. हा आठवडा आनंददायी ठरू शकतो. करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता असून व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत करण्याच्या दृष्टीने केलेले प्रयत्न यशस्वी ठरू शकतात. आरोग्याच्या बाबतीत सकारात्मक बदल जाणवू शकतात, मात्र नियमित दिनचर्या पाळणे महत्त्वाचे आहे.

Weekly Horoscope

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *