महावितरणच्या महिला शिपायाला
पाचशेची लाच घेताना अटक
नाशिक : प्रतिनिधी
विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना विद्युत निरीक्षक कार्यालयातील महिला कर्मचारी गीता हेमंत बोकडे , रा. फ्लॅट क्रमांक22, गणेश वास्तु अपार्टमेंट, अशोका मार्ग नाशिक यांना काल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. तक्रारदार या विद्युत अभियंता असून त्यांना विद्युत ठेकेदार व पर्यवेक्षक परवाना मिळण्यासाठी विद्युत निरीक्षक कार्यालय उद्योग ऊर्जा कामगार विभाग नाशिक येथे अर्ज करावयाचा असल्याने परवान्याकरिता लागणार्या कागदपत्रांची पूर्तता करून परवाना मिळून देईल, असे सांगून तक्रारदार यांच्याकडे 1500/- रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील 1000/-रुपये यापूर्वी स्वीकारले असून काल उर्वरित 500 रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.याप्रकरणी भद्रकाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक श्रीमती गायत्री मधुकर जाधव,
पोलीस हवालदार संदीप वणवे, पोलीस हवालदार ज्योती शार्दुल यांच्या पथकाने अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.