न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलिस कोठडी
सिन्नर : प्रतिनिधी
शहरात दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी ओढून नेण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि. 28) सायंकाळी सुमारे सहा वाजेच्या सुमारास घडली. मात्र, एका तरुणाने दाखवलेल्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. तरुणाने सराईत गुन्हेगाराला रंगेहाथ पकडले, तर त्याचा साथीदार गर्दीचा फायदा घेत फरार झाला.
मनीषा दत्तात्रय माळी (39, रा. रमाई अपार्टमेंट, वृंदावननगर, सिन्नर) या सरदवाडी रोडने अजिंक्यतारा चौकाकडे पायी जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन इसम तेथे आले. दुचाकी चालवत असलेल्या इसमाने महिलेला धमकावत मारहाण केली, तर मागे बसलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सुमारे अर्धा तोळा वजनाची, अंदाजे 70 हजार रुपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडली. झटापटीत महिला रस्त्यावर कोसळली.
ही घटना पाहताच निखिल उगले या तरुणाने प्रसंगावधान राखत थेट दुचाकीवर झडप घातली. त्याने आरोपी ऋषिकेश अशोक राजगिरे (24, रा. चुंचाळे, ता. अंबड, जि. नाशिक) याला दुचाकीवरून खाली खेचले. या झटापटीत दुचाकी रस्त्यावर कोसळली. मात्र, त्याचा दुसरा साथीदार घटनास्थळावरून
पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच अनिल वराडे घटनास्थळी दाखल झाले. पोलिस येईपर्यंत नागरिकांच्या मदतीने आरोपीला पकडून ठेवण्यात आले. त्यानंतर त्याला सिन्नर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिस तपासात ऋषिकेश राजगिरे हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्यावर जिल्ह्यात खून, चोरी व दरोडा यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी ही नाशिकच्या सातपूर परिसरातून दोन दिवसांपूर्वी चोरीस गेलेली असल्याचेही तपासात उघड झाले.
राजगिरे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
फरार साथीदाराचे नाव निष्पन्न झाले असून, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी व्यक्त केला. या प्रकरणी सिन्नर पोलिस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 309(4), 63 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
70 हजारांचा मुद्देमाल जप्त
राजगिरे याने माळी यांच्या गळ्यातील अर्धा तोळा वजनाची सोन्याची पोत ओरबाडली होती. त्यातील अर्धी पोत महिलेच्या हातात राहिली होती. उर्वरित पोत पोलिसांनी आरोपीकडून जप्त केली आहे.
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…