तरुणाला तरुणीने घातला 39 लाखांचा गंडा

शहापूर : प्रतिनिधी
विवाह करण्यासाठी कल्याणमधील एक तरुण मनपसंत तरुणीच्या शोधात होता. ऑनलाइन वधू-वर सूचक मंडळाच्या माध्यमातून उपवर वधूचा शोध घेत असताना, तरूणाला शादी डॉट कॉम या वधू- वर सूचक मंडळाच्या ऑनलाइन व्यासपीठावर एका तरुणीशी ओळख झाली. या तरुणीने कल्याणमधील तरुणाबरोबर ओळख वाढवून, लग्न करण्याची तयारी दर्शवून त्यांच्याकडून गेल्या दोन महिन्यात गुंतवणुकीच्या नावाखाली 39 लाख 80 हजार रुपये उकळून आर्थिक फसवणूक केली आहे.
कल्याण पश्चिमेतील बैलबाजार परिसरात राहत असलेला हा 35 वर्षांचा तक्रारदार तरुण दूध पुरवठ्याचा व्यवसाय करतो. या तरूणाच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी आयसी मार्केट कस्टमर सर्व्हिस या टेलिग्राम निगडित कंंपनीतील अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अद्याप कोणाला अटक करण्यात आलेली नाही. मार्च ते एप्रिल या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार शादी डॉट कॉम या ऑनलाइन व्यासपीठावर घडला आहे.
तक्रारदाराने पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपण विवाहासाठी सुयोग्य मुलीच्या शोधात आहोत. विविध वधू-वर सूचक मंडळांच्या माध्यमातून उपवर तरुणीचा शोध घेत असताना आपणास शादी डॉट कॉम या वधू-वर सूचक मंडळाच्या ऑनलाइन व्यासपीठावर दिव्यानी अग्रवाल या
तरुणीशी ओळख झाली. हे दोघे तरुण, तरुणी नियमित संपर्कात राहू लागले. तरुणीने तक्रारदार तरुणाला आपण तुमच्या बरोबर लग्नासाठी इच्छुक आहोत. लवकरच आपण लग्न करू, अशा आणाभाका तरुणीने घेतल्या.
विवाहासाठी इच्छुक तरुणीने तरुणाचा विश्वास संपादन केल्यानंतर संबंधित तरुणीने तरुणाला फॉरेक्स ट्रेंडिंगमध्ये गुंतवणूक करून डॉलरमध्ये आपणास नफा मिळवून देते, असे आमिष दाखविले. होणारी पत्नी आपणास गुंतवणुकीतून नफा मिळवून देते म्हणून तरुणाने तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. तरुणीने गुंतवणुकीची तयारी दर्शविल्यावर दिव्यानी अग्रवाल हिने तरुणाला आयसी मार्केट व्हीआयपी नावाची जुळणी पाठवली.
ती स्वतःच्या मोबाईलवर स्थापित करण्यास सांगितली. त्यानंतर तरुणीने तक्रारदार तरुणाच्या नावाने एक गुंतवणूक व्यवहारासाठी ऑनलाइन जुळणी उघडली. तरुणीने तरुणाला आयसी मार्केट कस्टमर सर्व्हिसेसच्या नियंत्रकाशी संपर्क करण्यास सांगितले.
नियंत्रकाने तरुणाला टप्प्याने त्याने दिलेल्या बँक खाते क्रमांकावर रक्कम पाठविण्यास सांगितले.
तरुणाची बँक व्यवहाराची माहिती तरुणीने स्वतःच्या ताब्यात नियंत्रकाच्या माध्यमातून घेतली. गेल्या महिनाभराच्या कालावधीत तरुणाने या गुंतवणूक योजनेत एकूण 39 लाख 80 हजार रुपये टप्प्याने गुंतवले. त्यानंतर तरुणाने तरुणीला आकर्षक परतावा देण्याची मागणी, तसेच विवाह कधी करायचा अशी विचारणा सुरू केली. तरुणीकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येऊ लागली.
तरुणीने तक्रारदाराच्या संपर्काला प्रतिसाद देणे बंद केले. तरुणीने आपल्या बरोबर विवाह नाहीच केला. उलट आपल्याजवळील 39 लाखांची रक्कम ऑनलाइन माध्यमातून लुटली. याची खात्री पटल्यावर तरुणाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात
शुक्रवारी तक्रार केली. पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशसिंग गौड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Gavkari Admin

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

19 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

19 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

19 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

19 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

19 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

20 hours ago