19 वर्षांनंतर जुळून आला योग
नाशिक : प्रतिनिधी
श्रावणमासी हर्ष मानसी.. हिरवळ दाटे चोहीकडे असे श्रावणाचे वर्णन केले जाते. श्रावणमासाला धार्मिक अधिष्ठान लाभलेले असल्याने व्रतवैकल्याचा महिना म्हणूनही श्रावणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
हिंदू धर्मामध्ये श्रावण मासाला अधिक महत्त्व आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकराची आराधना केली जाते. त्यामुळे श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी महादेवाची पूजा करत उपवास केला जातो. यंदा मात्र अधिक तथा पुरुषोत्तम मासमुळे श्रावण महिना दोन महिन्यांचा असणार आहे. दरवर्षी श्रावणात चार ते पाच सोमवार येतात. मात्र, यंदा श्रावण महिन्यात 8 सोमवार आल्याने भाविकांकडून ‘बम बम भोले’चा गजर करत महादेवाची आराधना करण्यात येणार आहे. दि. 17 जुलै रोजी आषाढ अमावास्या असून, दि. 18 जुलैपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. पहिला श्रावणी सोमवार 22 जुलै रोजी असणार आहे तर शेवटचा श्रावण सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी असणार आहे.हिंदू पंचांगानुसार यावेळी श्रावण महिना सुमारे 2 महिन्यांचा असणार आहे. श्रावण महिना 18 जुलै पासून सुरू होईल आणि 15 सप्टेंबरपर्यंत चालेल. म्हणजेच यावेळी एकूण 59 दिवस भाविकांना भगवान शंकराची आराधना करण्याची संधी मिळणार आहे. 19 वर्षांनंतर हा योग आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी 18 जुलै ते 16 ऑगस्टदरम्यान अधिकमास असेल. त्यामुळे यंदा 4 ऐवजी 8 श्रावणी सोमवार असतील.
पहिला सोमवार : 24 जुलै
दुसरा सोमवार : 31 जुलै
तिसरा सोमवार : 7 ऑगस्ट
चौथा सोमवार : 14 ऑगस्ट
पाचवा सोमवार : 21 ऑगस्ट
सहावा सोमवार : 28 ऑगस्ट
सातवा सोमवार : 4 सप्टेंबर
आठवा सोमवार : 11 सप्टेंबर
अधिकमासात दानधर्म, गंगेत स्नान करावे, परमेश्वराचे यज्ञ याग अधिष्ठान करावे. व्रतवैकल्य श्रावण मासात करावे.
– रवींद्र देव धर्माधिकारी
राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…
- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…
- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…
- अॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्या व्यक्तीला…
- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…
चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…