महाराष्ट्र

आघाडी की बिघाडी?

आघाडी की बिघाडी?
करंट इश्यू : अश्विनी पांडे
नाशिक लोकसभेचा गुंता काही केल्या सुटण्यास तयार नाही. मतदानासाठी जेमतेम 28 दिवस उरले असताना महायुतीचे काही ठरत नाही. त्यामुळे विद्यमान खासदारांचा जीव टांगणीला लागलेला असताना महाविकास आघाडीने मात्र आपला उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडीही घेतली आहे. दिल्लीतून आपल्या उमेदवारीचा शब्द मिळाला असतानाही आपली उमेदवारी जाहीर होत नसल्याचे पाहून अखेर छगन भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेत मिळालेली जागा का सोडून दिली? हे अजित पवारांनाच विचारा, असे म्हणत आपला संतापही व्यक्त केला. आता ही जागा शिंदे गटाने हट्टाने आपल्याकडे घेतली आहे. आता हा हट्ट पाहता जो उमेदवार महायुती देईल त्याला भाजपा, राष्ट्रवादीची मंडळी मनापासून साथ देईल का? हा खरा प्रश्न आहे. महाविकास आघाडीकडून एकदिलाने महायुतीवर जोरदार टीकेचे बाण सोडत प्रचार केला जात असताना, महायुतीतील मित्रपक्षांच्या  सन्मवयाच्या अभावामुळे नाशिकसह अन्य काही ठिकाणचे उमेदवारही जाहीर होऊ शकले नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीने प्रचारात आघाडी घेतली असताना महायुतीचा उमेदवारच न जाहीर झाल्याने इच्छुकांसह कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था पसरल्याचे चित्र आहे.  महायुतीच्या बेबनावाचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यताही आता ज्येष्ठ नेत्यांना वाटू लागली आहे. त्यामुळे  महायुतीचा बेबनाव महायुतीच्या पथ्यावर पडणार का हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
2024 च्या लोकसभा निवडणूका या महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ऐतिहासिक ठरणारी आहे. अर्धा डझन पक्ष यंदाच्या निवडणुकीत आपले नशीब अजमावणार आहे. महाराष्ट्रात आत्तापर्यंत युती विरुद्ध आघाडी असणारी लढत आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी होत आहे. त्यातच गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात  अभूतपूर्व असा बदल झाला. लोकसभा निवडणुका लागण्याच्या आधी  महायुतीचे पारडे अनेक अर्थाने जड असल्याचे चित्र होते. महायुतीची राज्यात आणि केंद्रात असलेली सत्ता,  राम मंदिर प्रतिष्ठापनेचा मुद्दा, प्रतिस्पर्धी पक्षात झालेली फूट, मोदी फॅक्टर हे मुद्दे महायुतीसाठी फायद्याचे ठरतील असे चित्र निर्माण होते. मात्र,  प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून विशेष करून भाजपाने उमेदवारी देण्यावरून विविध  पडताळण्या करत  उमेदवारी जाहीर करण्यास  मोठा विलंब झाला. नाशिक, पालघर, ठाणे या लोकसभा मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर होऊ शकले नाहीत. तसेच काही ठिकाणी दिलेला उमेदवार महायुतीने बदलला. त्यातच या जागा नेमक्या महायुतीतील कोणत्या पक्षाला मिळणार याबाबतही संभ्रम असल्याने महायुतीचे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. दुसरीकडे  महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट  आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षांत फूट पडल्याने जागा वाटप करताना महायुतीतील तिन्ही पक्षांनी सुरुवातीपासूनच सन्मवय साधत सबुरीने जागावाटपाचा मुद्दा सोडवला. उमेदवार जाहीर करण्यात आाघाडी घेत प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून नियोजित पद्धतीने प्रचार सुरू असताना महायुतीत मात्र आलबेल नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रचारात महायुती मागे पडण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीकडे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासारखे मातब्बर नेते असून, दोन्ही नेत्यांच्या पक्षात फूट झाल्याने सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने आहे. त्यातुलनेने महायुतीतील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याबद्दल गेल्या दोन वर्षांत घडलेल्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे काही प्रमाणात नाराजीचा सूर आहे.   नाशिक लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप ठरत नसल्याचे चित्र आहे. मात्र, महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने नाशिक लोकसभेसाठी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देत आघाडी घेतली.  उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राजाभाऊ वाजे यांनी प्रचाराला सुरुवात केली. भेटीगाठीवर भर देत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्तेेही चौकसभा, डोअर टू डोअर प्रचाराव भर देत आहे. नाशिक लोकसभेची निवडणूक शेवटच्या टप्प्या असल्याने शहरात अद्याप निवडणूक प्रचारासाठी मोठा राजकीय नेता अवतरला नाही. पण महाविकास आघाडीने प्रचाराला सुरुवात करत रणशिंग फुंकले आहे. तर दुसरीकडे महायुतीत रोज नवनवीन नावाची चर्चा होत असून, महायुतीतील तिन्ही पक्ष नाशिकची जागा मिळावी म्हणून आग्रही असल्याने महायुतीचा नाशिकचा उमेदवार अद्याप ठरू शकला नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसे, शिवसेना नेते अजय बोरस्ते,  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, भाजपा आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यात आता छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. उमेदवारीची घोषणा होत नसल्याने  20 मेपर्यंत तरी उमेदवारीची घोषणा करावी असे उपरोधिक भाष्य ही भुजबळ यांनी केले होते. भुजबळ यांनी माघार घेऊन 24 तास उलटून गेल्यावरही महायुतीचा उमेदवार जाहीर होऊ शकला नाही. निवडणुकांना अवघे 29 दिवस शिल्लक असतानाही उमेदवार ठरत नसल्याने  महायुतीचे प्रचाराचे नियोजन सुरू असले तरी कोणाचा प्रचार करायचा हे ठरत नसल्याने महायुतीच्या कार्यर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे सध्या तरी महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या राजाभाऊ वाजे यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांत सध्या सुरू असलेली जागावाटपावरूनची रस्सीखेच एका टप्प्याचे मतदान झाल्यावरही संपण्याचे नाव घेत नाही. जागावाटपात नसलेला समन्वय जर प्रचारात दिसला नाही तर याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
Bhagwat Udavant

Recent Posts

साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज

गाडीत पैसे असल्याच्या संशयावरून राडा साकोरा येथे गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठी चार्ज नांदगांव /…

2 days ago

जुने नाशिक भागात आमदार फरांदे यांनी साधला सवांद

नाशिक : प्रतिनिधी नाशिक मध्यचे दोन्ही उमेदवार देवयानी फरांदे आणि वसंत गीते एकाच वेळी  आल्याने…

2 days ago

नांदगावमध्ये सुहास कांदे आणि समीर भुजबळांमध्ये राडा

नांदगाव: येथील मतदार संघात आज समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात आज पुन्हा राडा झाला.…

2 days ago

यांनी बजावला मतदानाचा हक्क

नाशिक: लोकशाहीचा उत्सव असलेल्या मतदानास सकाळी 7 वाजेपासून सुरुवात झाली आहे, मतदानाचा हक्क बजावत अनेकांनी…

2 days ago

जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान

  जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ६. ८९ टक्के मतदान नाशिक मध्य मध्ये दोन तासात सर्वाधिक…

2 days ago

बनकर, कदम यांनी बजावला मतदानाचा हक्क

निफाड:- प्रतिनिधी निफाड विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उ बा ठा चे उमेदवार माजी आमदार अनिल कदम…

2 days ago