नाशिक

स्मार्ट पार्किंगचे घोडे अडलेलेच!

टेंडर सेलकडून कार्यवाही होईना…

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागील चार-पाच महिन्यांपासून निविदा प्रक्रिया राबवत आहे. दरम्यान, पहिल्या निविदेत प्रतिसाद न मिळाल्याने प्रशासनावर फेरनिविदा काढण्याची नामुष्की ओढावली. त्यानंतर पाच संस्थांनी स्मार्ट पार्किंगकरिता उत्सुकता दर्शवली.

शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी महापालिकेच्या वाहतूक सेलने 28 ठिकाणी स्मार्ट पार्किंगचे नियोजन केले आहे. दरम्यान, ठेकेदाराने पालिकेला महिन्याला 35 लाख रुपये द्यावे, या जाचक अटीमुळे ठेकेदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र होते. प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ही रक्कम 22 लाखांवर आणली; परंतु तरीही ठेकेदारांनी निरुत्साह दाखवला. प्रशासनाने आंणखी एक पाऊल मागे घेत ही रक्कम तेरा लाखांवर आणली. त्यानंतर तीन संस्थांनी या कामास तयारी दर्शवली आहे. 22 ऑनस्ट्रीट आणि सहा ऑफस्ट्रीट अशा एकूण 28 स्मार्ट पार्किंगसाठी 17 सप्टेंबर रोजी निविदा प्रक्रिया प्रसिद्ध केली होती. शहरात दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत भर पडत आहे. वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर वाहने लावून दिली जातात. परिणामी, वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो. सिंहस्थात कोट्यवधी भाविक येणार असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये, याकरिता कुंभमेळ्यापूर्वी वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली लावला जाणार आहे. स्मार्ट पार्किंगमुळेे 4155 वाहने विशिष्ट ठिकाणी उभी करता येणार आहेत. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी वाहतुकीची समस्या
उद्भवणार नाही.

The smart parking horses are stuck!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago