मनपाने लादलेली जाहिरात परवाना शुल्कवाढ रद्द करा




नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनची पालकमंत्र्यांना निवेदन 

नाशिक : प्रतिनिधी

मनपाच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टीने मनपा प्रशासनाने जाहिरात परवाना शुल्कात जवळपास चार पटींनी वाढ केली आहे. याची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून सुरू करण्याबाबत मनपा आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आदेश काढला आहे. मात्र या निर्णयामुळे व्यावसायिक होर्डिंगधारक नाराज झाले असून, ही शुल्कवाढ व आदेशातील जाचक अटी रद्द करण्याबाबत नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदन देऊन केली

यावेळी पालकमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले. शुल्क वाढीबरोबरचं मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशातील इतर सर्व अटी होर्डिंगधारकांवर लादल्या जात असून यामुळे हा व्यवसाय काही वर्षात संपुष्टात येवू शकतो. यापूर्वीही अनेकदा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला.l. मात्र प्रत्यक्ष भेटीनंतर सविस्तर चर्चा करून व अडी अडचणी समजावून घेवुन आदेश काढावा. अशी विनंती असोसिएशनने केल्यानंतर भेटीचे आश्वासन आयुक्तांनी दिले. मात्र ते पाळले नाही व न कळविता अन्यायकारक आदेश काढण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती दिली असून लवकरच त्यांच्याकडे ही निवेदन याबाबत चर्चा केली जाणार आहे. मनपाला जीएसटी, विविध कर, घरपट्टी, पाणीपट्टी व बाजार फी वसुलीच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. विविध करांमध्ये जाहिरात परवाना शुल्काचा समावेश होतो.
उत्पन्नवाढीसाठी मनपाने मे २०२२ मध्ये समिती गठीत केली होती. या समितीच्या अहवालानुसार जाहिरात फलकांची स्थळनिश्चिती व दरात वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर दर तीन वर्षांनंतर दरवाढ करण्यात येणार असल्याने व्यावसायिक जाहिरातदार तसेच होर्डिंगधारकांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. तसेच यात परिसरानुसार अ व ब अशी वर्गवारी दाखविण्यात आली. मात्र सद्यास्थितीत उभे असलेले सर्व फलक अ याचं वर्गवारी करण्यात आले आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील महासभेने जाहिरात परवाना शुल्क सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानुसार एक जानेवारी २०२३ पासून नवीन दर व नियमावली लागू झाले. मात्र दरवाढ व तयार करण्यात आलेल्या नियमावलीमुळे स्थानिक जाहिरातदार संस्थांना व्यवसाय करता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आल्याचा आरोप असोसिएशनने केला आहे. मनपाने चलनवाढीचा आधार घेत जाहिरात शुल्कात थेट चार पट वाढ केली आहे. नाशिकच्या विकासाची गती पाहता किमान दहा टक्के शुल्क वाढ होणे अपेक्षित असताना मनपाने थेट २० टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. यामुळे स्पर्धा निर्माण होऊन तसेच आर्थिक उलाढाल पाहता छोट्या व्यावसायिक जाहिरातदारांना संपवण्याचा हा एक प्रकारचा कटच असल्याची बोलले जात आहे.

पालकमंत्री  दादा भुसे यांना निवेदन देतांना नाशिक आउटडोअर ॲडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनचे सरचिटणीस गणेश बोडके, सदस्य अनुप वझरे, निलेश विसपुते उपस्थित होते.

Ashvini Pande

Recent Posts

घिबली अ‍ॅपची कमाल; मशालच्या जागी कमळ!

घिबली अ‍ॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…

1 day ago

नियोजित वधुचे अफेअर उघड, विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन

नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…

2 days ago

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग

लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…

3 days ago

नाशिकरोडला डॉ. आंबेडकर यांची जयंती उत्साहात

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…

4 days ago

सिन्नर तालुक्यात अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम

शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर  प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…

4 days ago

शहरात पाण्याच्या टँकरची संख्या वाढली

80 फेर्‍या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…

4 days ago