उत्तर महाराष्ट्र

सहा लाखांची लाच मागणारे सहकार विभागाचे दोघे जाळ्यात

सहा लाखांची लाच मागणारे
सहकार विभागाचे दोघे जाळ्यात
नाशिक : प्रतिनिधी
सहा लाखांची लाच मागणार्‍या सहकार विभागातील अधिकार्‍यासह लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी काल अटक केली. भिमराव यशवंत जाधव, सहकार अधिकारी आणि अनिल नथुजी घरडे, वरिष्ठ लिपिक अशी या दोघा लाचखोरांची नावे आहेत.  तक्रारदार हे  को.ऑप क्रेडिट सोसायटीचे क्लार्क असून, सोसायटीच्या नियमानुसार सभासद यांनी कर्ज भरले नाही म्हणून सभासदांच्या  घर लिलाव  विक्रीचा आदेशाविरुद्ध विभागीय सहनिबंधक कार्यालय,नाशिक येथे  सभासद यांनी रिव्हिजन दाखल केली होती. या प्रकरणाची चौकशी या कार्यालयात
सुरू होती. या कार्यवाहीची निकाल तक्रारदार यांच्या  को- ऑप क्रेडिट सोसायटीच्या बाजूने देण्यासाठी दोघांनी  तक्रारदाराकडे  6 लाख रुपयाची मागणी केली तसेच दि.7/12/2023 व दि.8/12/2023 रोजीचा   पडताळणी कारवाईत तक्रारदार यांच्याकडे तडजोडी अंती 5 लाख रुपये लाचेची मागणी केली म्हणून  दोघांवरही  मुंबई नाका पोलिस स्टेशन, नाशिक शहर येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक नीलिमा डोळस, पोलीस नाईक संदीप हांडगे, सुरेश चव्हाण, यांच्या पथकाने ही कारवाई अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Bhagwat Udavant

Recent Posts

माणिकराव कोकाटे अजित दादांच्या भेटीला

मुंबई: विधानसभेत रमी खेळत असल्याच्या मुद्द्यावरून जोरदार टीका झाल्यामुळे चर्चेत आलेले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे…

3 hours ago

ठाकरे गटाच्या या बड्या नेत्यावर नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल

खासदार संजय राऊत यांच्यावर नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नांदगाव आमिन शेख शिवसेना उद्धव बाळासाहेब…

20 hours ago

मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल

  मुलींचा सांभाळ करण्याचा कंटाळा आल्याने  आईने उचलले भयानक पाऊल शहापूर : साजिद शेख शहापूर…

1 day ago

ट्रॅपची माहिती होती, तर सतर्क का केले नाही?

मंत्री गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांना सवाल नाशिक : प्रतिनिधी पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी…

1 day ago

साप्ताहिक राशिभविष्य

दि. 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2025 पुरुषोत्तम नाईक मेष : आप्तेष्टांच्या गाठीभेटी या सप्ताहात…

1 day ago

महापालिका जिंकायचीय, वाद टाळून कामाला लागा

मंत्री गिरीश महाजन : सुनील बागूल, राजवाडे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश नाशिक ः प्रतिनिधी भारतीय…

1 day ago