महावितरणचा सहायक अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात

नाशिक : प्रतिनिधी
घोटी येथील महावितरणच्या सहायक अभिंयत्यास चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. सचिन चव्हाण असे या लाचखोर सहायक अभियंत्याचे नाव आहे.
तक्रारदाराचा वॉटर फ्युरिफिकेशन प्लान्ट आहे. या प्लान्टवर असणार्‍या मीटरवर वाढीव वीज लोड मंजूर करुन देण्यासाठी सचिन चव्हाण यांनी चाळीस हजार रुपयांची लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. त्यामुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना सचिन चव्हाण यास पथकाने रंगेहाथ पकडले. उपअधीक्षक अभिषेक पाटील, सुखदेव मुरकुटे, प्रणय इंगळे यांच्या पथकाने अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर अधीक्षक नारायण न्याहाळदे, वाचक पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

चांदण प्रकाशातील झोप

गावापासून थोडं लांब, मळ्यातलं आमचं घर. शेजारून वाहणारा पाट, त्याच्या काठावर डोलणारी आंब्याची झाडं, विहिरीकडे…

1 hour ago

चिकाटी अन् जिद्द

चिकाटी आणि जिद्द हे शब्द बोलणे सोपे; परंतु करणे अवघड असतात. एखाद्या गरिबाला विचारा चिकाटी…

1 hour ago

एका चुकीमुळे उद्ध्वस्त आयुष्य…

क्षणभराच्या रागात घेतला निर्णय भारी, आणि आयुष्यभरासाठी पडली दुःखांची वारी! डोळ्यांत होती स्वप्नं, मनात होती…

1 hour ago

मी मन सम्राज्ञी

‘रिमझिम के तराने लेके आयी बरसात’ हे गाणं लागलं की, मनात मृद्गंंध दरवळायला लागतो... आणि…

1 hour ago

सामान्यांचा मरणोत्सव!

महागाईचा हा भडका काही अचानक लागलेला नाही. हे एका चुकीच्या आर्थिक नियोजनाचे आणि धोरणात्मक अकर्तृत्वाचे…

1 hour ago

निफाड शहरात रस्त्याने घेतला मोकळा श्वास

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अतिक्रमणविरोधी मोहीम निफाड : तालुका प्रतिनिधी शहरातील राज्य मार्ग क्रमांक 27 वर…

2 hours ago