ट्रकचालकासह हमालाचा दुर्दैवी मृत्यू
दिक्षी: प्रतिनिधी
शेणखताची वाहतूक करणाऱ्या मालट्रकच्या पाठीमागील बॉडीला वीजप्रवाह सुरू असलेल्या तारेचा धक्का लागल्याने चालकासह हमालाचा मृत्यू झाल्याची घटना निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवारी (दि. १६) सकाळी घडली. याप्रकरणी पिंपळगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे…पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील दावचवाडी येथे गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास मुंबई येथील पारसनाथ गणपत पाल मालट्रकमधून (क्र.एमएच १५ बीजे ७४८३) शेणखत घेवून पिंपळगाव बसवंतमार्गे दावचवाडी गावात आले.
तेथून शेणखत खाली करणारे हमाल पप्पू सोमनाथ यादव व विजय प्रल्हाद शिंदे यांना गाडीमध्ये बसवून पालखेड शिवारातील शेतकरी बाळासाहेब नाना आहेर यांच्या शेतात दावचवाडी – पालखेड शिव रस्त्याने जात होते.याठिकाणी लोंबकळलेल्या वीजवाहक तारेचा ट्रकला धक्का लागला. त्यामुळे ट्रकमध्ये वीजप्रवाह उतरला. त्यानंतर क्लिनर बाजूचे पाठीमागील टायर फुटले आणि चालक व हमाल बाहेर फेकले गेले. यात चालक आणि हमाल या दोघांचा मृत्यू झाला आहे.तर हमाल पप्पू सोमनाथ यादव याने गाडीतून उडी मारली. तोपर्यंत वीजप्रवाह बंद झाल्याने तो वाचला. मृतांमध्ये ट्रकमालक पारसनाथ गणपत पाल (वय ६३, रा. घर नं. ६३०, शिवशक्ती नगर, ठाणे, बेलापूर रोड, तुर्भे स्टोर, नवी मुंबई, तुर्भे, ठाणे) व हमाल विजय प्रल्हाद शिंदे (वय ३९, मुळ रा. सोनुन, ता. चोंढी, जि. अकोला, ह. मु. दावचवाडी, ता. निफाड, जि. नाशिक) या दोघांचा समावेश आहे.इलेट्रीक शॉक लागल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अशोकराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे तपास करत आहे
सर्वपक्षीयांकडून जड अंतःकरणाने श्रद्धांजली; कार्यकर्त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला नाशिक ः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख…
टेंडर सेलकडून कार्यवाही होईना... नाशिक : प्रतिनिधी नाशिक महापालिका शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी…
बांगलादेशने दुराग्रही भूमिका घेऊन भारतात होणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचा हा…
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अपघाती निधन वेदनादायी आहे. राज्याचे सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून व दीर्घकाळ…
महाराष्ट्रात ज्यांना जाणता राजा म्हटले जाते, त्या शरद पवारांच्या सावलीत वाढलेले एक बोलके, दिलखुलास राजकीय…
सिन्नर : प्रतिनिधी तालुक्यातील मीठसागरे शिवारात बुधवारी (दि. 28) सकाळी चार वर्षे वयाची बिबट्याची मादी…