सिन्नर प्रतिनिधी
विवाह समारंभ आटोपून घरी परतत असतांना दुचाकीस खाजगी बसने जबर धडक दिल्याने 65 वर्षीय महिला ठार झाल्याची घटना नांदूरशिंगोटे शिवारात मंगळवारी (दि. 10) दुपारी तीन वाजता घडली. कौसाबाई संतु बोडके (वय 65, रा. वडझिरे ता. सिन्नर) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.
वावी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नांदुर-शिंगोटे येथे नातेवाईकांचा विवाहसोहळा आटोपून घरी जात असताना हा अपघात घडला. वडझिरे येथील संतू बोडके (वय 70) व त्यांच्या पत्नी कौसाबाई बोडके हे दाम्पत्य दुचाकीवरुन (क्र. एम एच 15 बी एम 3977) जात असताना बाह्यवळण रस्त्यावर खाजगी बसने (क्र. एम एच 17 ए जी 65 68) दुचाकीला जबर धडक दिली. खाजगी बस संगमनेरकडे जात होतीकौसाबाई गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर पती संतु बोडके जखमी झाले. ते खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आर. टी. तांदळकर पुढील तपास करीत आहेत.