ट्रॅक्टरखाली चिरडून चिमुकल्याचा मृत्यू

सातपूर: वार्ताहर
ध्रुवनगर परिसरात ट्रॅक्टरवरून खाली पडून चाकाखाली सापडलेल्या एका पाच वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. राघव दिनकर शिंदे असे या चिमुकल्याचे नाव आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात राघवचे वडिल दिनकर विश्वनाथ शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर शिंदे हे पाण्याचा टँकर जोडून ट्रॅक्टर चालवत होते. त्यावेळी ट्रॅक्टरच्या डाव्या बाजूला राघव बसलेला होता. तोल जाऊन तो खाली पडला. ट्रॅक्टरचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने राघवचा मृत्यू झाला. यामुळे भैरवनाथ शिंदे यांच्या फिर्यादीनुसार दिनकर शिंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *