काय तो पाऊस.. काय ते धबधबे..एकदम ओक्के

काय तो पाऊस.. काय ते धबधबे..एकदम ओक्के
पर्यटकांची पावले वळती पावसाळी पर्यटनाकडे
नाशिक ः देवयानी सोनार
काय तो पाऊस… काय ते धबधबे… काय ते स्वर्गाहून रम्य वातावरण सर्व कसं पावसाळी पर्यटन एकदम ओक्के असे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पावसाळी पर्यटनासाठी पर्यटकांकडून शुभस्य शिघ्रम प्लॅनिंग केले जात असल्याचे चित्र आहे.
मान्सूनचे आगमन झाले असले तरी सर्वानाच दमदार पावसाची प्रतिक्षा अजूनही आहे.जूनच्या दोनचार दिवसांचा पाऊस सोडला तर पुढील मुसळधार पावसाची प्रतिक्षाच केली जात आहे.जून आणि जुलैच्या पावसामुळे वातावरणात गारव्या बरोबर सभोवतालचा परिसर देखील कुंद,हिरवागार आणि निसर्गरम्य झाला आहे.डोंगरमाथ्यावरून वाहणारे धबधबे, अधूनमधून संततधार कोसळणारा पाऊस असे हे निसर्गरम्य वातावरण पर्यटकांना मोहित करते. त्यामुळे आल्हादायक वातावरणात पर्यटकांची पावले जवळपासच्या पर्यटनक्षेत्री वळत आहेत. शहराच्या आसपास असलेल्या पर्यटनस्थळांवर वीकेन्डला गर्दी होत असल्याचे चित्र आहे.
विकेंडला कुटुंबीयांसमावेत पर्यटनाचे बेत आखले जाते. नाशिकपासून जवळच असलेल्या इगतपुरी परिसारातील निसर्ग धबधबे पावसाळ्यात पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असतात. अप्पर वैतरणा धरण, भंडारदरा धरण, खोडाळा, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा, तसेच सांदण दरी, रंधा धबधबा वणी सापुतारा,भंडारदरा,त्रंबकेश्‍वर,ब्रह्मगिरी,अंजनेरी,जव्हार,इगतपुरी,नांदुरमध्यमेश्‍वर,दुधसागर धबधबा या ठिकाणीदेखील पर्यटक जाण्यासाठी उत्सुक असतात.त्याचप्रमाणे कसारा घाटाजवळ भातसा रिव्हर व्हॅली, उंट दरी, पाच धबधबे या ठिकाणीही पावसाळ्यात गर्दी होत असते. कसारा घाटातील धुके अनुभवण्यासाठी सकाळपासूनच अनेक तरुण धुके अनुभवण्यासाठी रस्त्यावर उभे राहतात.
चौकट
त्र्यंबकेश्‍वरचे सौंदर्य खुणावतेय पर्यटकांना
त्र्यंबकेश्वर येथील दुगारवाडी धबधबा पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण आहे. पेगलवाडी, पहिने ही गावे पावसाळ्यात हिरवीगार झालेली असतात. छोटेमोठे धबधबे उंच सखल भागातून वाहतंाना नयन रम्य दृष्य पर्यटक मोबाइलमध्ये साठवत सेल्फी काढत व्हायरल करतात.त्यामुळे गेल्या दोन वर्षाच्या कोरोना संकटामुळे पर्यटकांना पावसाळी पर्यटनावरही बंधने आली होती.त्याशिवाय पर्यटनस्थळी पर्यटकांचा धुडगुस पर्यावरणाची होणारी हानी,सेल्ङ्गी घेतांना होणारे अपघात लक्षात घेता बंदी करण्यात आली होती.
नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी महामंडळाच्या बसेस उपलब्ध असल्या तरी पर्यटक दुचाकी आणि चारचाकी घेवून प्रत्येक निसर्गरम्य आणि धबधब्याच्या ठिकाणी थांबून सेल्ङ्गी घेतात.

. एका दिवसात परत येण्याची ठिकाणे म्हणून पर्यटक जवळच्या ठिकाणांना पसंती देतात. सोमेश्वर धबधब्यावर वीकेन्डला पर्यटक आणि कॉलेजियन्स् गर्दी करतात.पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी गोदावरी नदीवरील सोमेश्वर धबधबा ही पसंतीची ठिकाणे आहेत. बाहेरगावचे अनेक पर्यटक जवळपासच्या ठिकाणी तसेच नदीच्या पाण्यात डुबकी मारत गंगास्नान आणि पाऊस असा दोहींचा अनुभव घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *