राणेनगर रस्त्यावर अपघातरोधक लाइफस्टोन

इंदिरानगर : वार्ताहर
राणेनगर-राजीवनगरच्या मुख्य रस्त्यावर असणार्‍या दुभाजकांभोवती लाइफस्टोन बसविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या सुमारे 50 लाख रुपयांच्या विशेष निधीतून हे काम पूर्ण होणार आहे.
लाइफस्टोनमुळे रात्री-अपरात्री या दुभाजकांवर वाहन आदळून होणार्‍या अपघातांना आता आळा बसणार आहे. विशेष म्हणजे पुणे, मुंबईनंतर या प्रकारची व्यवस्था नाशिकमध्ये पहिल्यांदाच होत आहे. लाइफस्टोनच्या कामात दुभाजकाच्या दोन्ही बाजूने प्लास्टिक फायबर मटेरिअल असणारे हे लाइफस्टोन बसवण्यात येत आहेत. त्यात दिव्यांची व्यवस्था असल्याने रात्रीच्या अंधारातदेखील ते प्रकाशमान होतील. त्यामुळे वाहनचालकांना दुभाजकाचा अंदाज येऊन वाहन त्यावर धडकत नाही. सुमारे दीड किमी अंतरावर हे स्टोन बसवण्यात येत आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचा औपचारिक उद्घाटन सोहळा होणार असल्याची माहिती माजी सभापती अमोल जाधव यांनी दिली.

मुंबई, पुण्यानंतर नाशिक शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारचे काम होत आहे. या भागातून प्रवास करणार्‍या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही उपाययोजना करण्यात आली आहे.
– अमोल जाधव, माजी सभापती

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *