नाशिक

पिंपळगाव टोलनाका ठरतोय ‘कट पॉइंट’ मृत्यूचा सापळा

कारच्या धडकेत शिक्षिका ठार

पिंपळगाव बसवंत / दिक्षी : प्रतिनिधी
मुंबई-आग्रा महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथील टोलनाका परिसरात मंगळवारी (दि. 30) सकाळी सव्वाआठला भीषण अपघात झाला.
कादवा नदी पुलावर भरधाव कारने स्कूटीला मागून धडक दिल्याने मनीषा देवीदास निरभवणे (वय 38) यांचा मृत्यू झाला. त्या शिक्षिका असून, नेहमीप्रमाणे शाळेत शिकविण्यासाठी घरातून निघाल्या होत्या.
नाशिककडून पिंपळगावकडे येणार्‍या मारुती स्विफ्ट (एमएच 15-जीआर 1631) कारने त्यांच्या ओला इलेक्ट्रिक स्कूटीला (एमएच 15-केडी 2069) पाठीमागून जोराची ठोस दिली. अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी फिर्यादी रवींद्र सुदाम निरभवणे यांच्या तक्रारीवरून कारचालक आकाश भाऊसाहेब शेवाळे याच्यावर पिंपळगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या घटनेनंतर काही तासांतच याच टोलनाका परिसरात सिटीलिंक बस व मोटारसायकलचा अपघात झाला. या अपघातात महिला व दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक तपासात हा अपघात राँग टर्नमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बसचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

शॉर्टकट अपघातांचे कारण
टोलनाक्यालगत असलेले अवैध कट पॉइंट व साकोरे एमआयडीसीकडे जाण्यासाठी वापरला जाणारा शॉर्टकट हे अपघाताचे मुख्य कारण आहे. वेळ वाचविण्यासाठी अनेक वाहनधारक या कट पॉइंटचा वापर करतात, ज्यामुळे समोरून येणार्‍या वाहनांना अचानक अडथळा निर्माण होतो. अधिकृत रस्ता उपलब्ध असतानाही शॉर्टकट संस्कृती थांबत नसल्याने जीवघेणे अपघात वाढत आहेत.

Accused absconding in two theft cases for 18 years arrested

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago