नाशिक

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी अखेर प्राधिकरणाची स्थापना

विभागीय आयुक्त अध्यक्ष; जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक उपाध्यक्ष

नाशिक : प्रतिनिधी
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकारने प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरणाची स्थापना केली आहे. या अध्यादेशास राज्यपालांच्या स्वाक्षरीने मंजुरी देण्यात आली आहे.
कुंभमेळ्याच्या प्राधिकरणात 22 अधिकार्‍यांचा सामावेश असणार आहे. विभागीय आयुक्त हे अध्यक्ष असतील तर जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षक हे उपाध्यक्ष असतील. मागील कुंभमळ्यातच नाशिकसाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्राधिकारण स्थापन होऊ शकले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्यांपूर्वी नाशिक दौर्‍यावर येत कुंभमेळा प्राधिकरणाची घोषणा केली होती. सध्या नाशिकसाठी नाशिक महापालिका आणि त्र्यंबकेश्वरसाठी जिल्हा प्रशासनाच्या अंतर्गत यंत्रणा कार्यरत आहे. परंतू आता प्राधिकरण झाल्याने कुंभमेळयाचे नियोजन एकाच ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सिंहस्थाच्या कामांना गती मिळावी अशी अपेक्षा आहे.
नाशिक सिंहस्थ कुंभमळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार यंदा 22 महिन्यांचा पर्वकाळ असून यात 42 अमृत स्नानाच्या तारखा आहेत. कुंभमेळा प्राधिकरणावर आखाड्याच्या प्रतिनिधींचा सामावेश असावा, अशी मागणी करण्यात आली होती मात्र साधू-महंताना यात स्थान दिले नसल्याचे अध्यादेशावरून स्पष्ट झाले आहे.
प्राधिकरणात यांचा असणार समावेश विभागीय आयुक्त (अध्यक्ष), जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक (उपाध्यक्ष), अहिल्यानगर जिल्हाधिकारी, नाशिक महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण आयुक्त, (पदसिध्द सदस्य) नाशिक शहर पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, नाशिक महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याधिकारी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद, नियोजन उपायुक्त, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ विभागीय नियंत्रक, आरोग्य उपसंचालक, अधिकक्ष अभियंता जलसंपदा गोदावरी नदी व जलव्यवस्थापन प्रभारी, बांधकाम विभाग मुख्य अभियंता, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अधिक्षक अभियंता वीज वितरण, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ प्रादेशिक अधिकारी, लेखा व कोषागारे सहसंचालक, रेल्वे मंडळाचे प्रतिनिधी, कुंभमेळा आयुक्त (सचिव) यांचा समावेश असेल.
प्राधिकरणाच्या स्थापनेमुळे विभागांच्या समन्वय घडवणे गतिमान होणार आहे. त्या माध्यमातून विकासकामांना गती देणे शक्य होणार आहे.
-डॉ. प्रवीण गेडाम, अध्यक्ष, नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण

वीस वर्षांपासूनच्या मागणीस यश

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणार्‍या सिंहस्थ कुंभमेळयाच्या व्यवस्थापनासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी गेल्या 20 वर्षांपासून होत होती. अखेर त्यास मुहूर्त लागला असून, नाशिक-त्र्यंबक सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. प्रयागराजच्या धर्तीवर सिंहस्थ प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

प्राधिकरणात साधू-महंतांचा सहभाग नाही. मात्र, याबाबत आमची नाराजी नाही. प्रयागराजच्या धर्तीवर प्राधिकरण असल्याने त्यानुसारच नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याची रचना असणार आहे. आता सिंहस्थाच्या कामांना गती देऊन भव्य कुंभमेळा होण्यासाठी प्रयत्न करावेत. लवकरच आखाडा परिषदेचे प्रतिनिधी प्राधिकरणाच्या अध्यक्षांची भेट घेतील.
– भक्तिचरणदास महाराज, वैष्णव आखाडा

 

Editorial Team

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

10 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

10 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

10 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

11 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

11 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

11 hours ago