अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस 20 वर्षाची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस 20 वर्षाची शिक्षा

दिंडोरी :  प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा आरोप सिद्ध झाल्याने संशयीतास 20 वर्षाची शिक्षा व 25 हजाराचा दंड ठोठावला आहे. या बाबत माहीती अशी,बाळु विठ्ठल बेंडकोळी रा.विळवंडी ,ता.दिंडोरी ,जि नाशिक याचे विरोधात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन दिंडोरी पोलिसात बलात्कार व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.2023 साली दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास दिंडोरी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार यांनी केला होता.आरोपी विरोधात सबळ पुरावे व दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले.सदर गुन्ह्याची सुणावणी  न्यायाधीश श्रीमती घुले यांचे विशेष अतिरीक्त सत्र न्यायालय क्रमांक 5 यांच्या न्यायालयात झाली.फिर्यादीच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता श्री मती लिना चव्हाण यांनी बाजु मांडली आरोपीच्या वतीने त्याच्या वकिलांनी बाजु मांडली,न्यायालयाने दोन्ही पक्षाच्या बाजु ऐकुन घेतल्या साक्षिदार व भौतिक पुरावे तपासले असता आरोपी विरोधात पुरावा मिळुन आल्याने भादवि कलम 376(2) (एफ) व पोक्सो 4,8 मधे दोषी ठरवुन 20 वर्षे सश्रम कारावास व 25 हजार रूपये दंड तसेच दंड न भरल्यास 1 वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे,सदर सुनावणीत पोउनि संजय पवार व पोहवा अबोने यांनी कामकाज पाहीले.

भागवत उदावन्त Admin

भागवत उदावंत हे गेल्या 25 वर्षापासून पत्रकारितेत असून, विविध दैनिकांत उपसंपादक, वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम केलेले आहे. गांवकरीत सध्या वृत्तसंपादक या पदावर कार्यरत आहेत. ऑनलाइन व डिजिटल पत्रकारिता बरोबरच राजकीय विषयावर विपुल लेखन केलेलं आहे. पत्रकारितेतील मास्टर पदवी त्यांनी मिळवलेली आहे.

Recent Posts

मातीशी नातं आणि शिक्षणाची वाट

Relationship with the soil and the path to education

21 hours ago

जिल्ह्यातील कृषी क्षेत्रात गती

- विष्णूपंत गायखे अध्यक्ष, दर बारा वर्षांनी येणारा कुंभमेळा नाशिककरांना तसा नवा नाही नाशिककर आपल्या…

21 hours ago