नाशिक

सायलेन्सर वापरणार्‍या बुलेटचालकांविरोधात कारवाई

सिडको : विशेष प्रतिनिधी
कॉलेजरोड परिसरात कर्णकर्कश आवाज करणारे आणि फटाके वाजविणारे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणार्‍या बुलेटचालकांविरोधात गंगापूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी जप्त केलेले तब्बल 112 मॉडिफाइड सायलेन्सर गुरुवारी रोडरोलरखाली टाकून
नष्ट केले.
गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कॉलेजरोड परिसरात काही बुलेटचालकांकडून मोठ्या आवाजाचे तसेच फटाके फोडणारे सायलेन्सर वापरले जात असल्याच्या तक्रारी सातत्याने प्राप्त होत होत्या. या पार्श्वभूमीवर गुन्हे शोध पथकाने विशेष मोहीम राबवत विविध वाहनचालकांवर कारवाई केली. वाहनांमध्ये बेकायदेशीररीत्या बसविण्यात आलेले मॉडिफाइड सायलेन्सर काढून ते कॉलेजरोड पोलीस चौकी येथे जप्त करण्यात आले होते. कॉलेजरोड पोलीस चौकी येथे जप्त करण्यात आलेल्या 112 सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. यापुढेही अशा प्रकारचे मॉडिफाइड सायलेन्सर वापरणार्‍या वाहनचालकांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला. ही कारवाई गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शेरमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल पवार, हर्षल अहिरराव, तुषार देवरे, पोलीस उपनिरीक्षक भारत पाटील तसेच पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या पथकाने केली.

Action against bullet drivers using silencers

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago