नाशिक

सोनगिरी गोळीबार प्रकरण; संशयित अटकेत

टोलनाक्यावर मध्यरात्री कारवाई; गोळीबार नेमका कुणी केला याचा तपास सुरू

सिन्नर : प्रतिनिधी
तालुक्यातील सोनगिरी येथील गोळीबार प्रकरणात पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुख्य संशयित सागर रामनाथ वाघ (29, रा. देशवंडी) याला बुधवारी (दि.29) रात्री उशिरा टोलनाक्यावर सापळा रचून अटक केली. दरम्यान, गोळीबारात दुसर्‍या आरोपीचा सहभाग असल्याची माहिती समोर आल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करत नाशिककडून सिन्नरकडे येणार्‍या कारमधून शिंदे टोलनाक्यावर रात्री सुमारे 11 वाजता वाघ याला ताब्यात घेतले.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र पाटील, हवालदार योगेश शिंदे, प्रकाश उंबरकर, उमेश खालकर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक सुदर्शन बोडके व हवालदार कैलास मानकर यांनी सहभाग घेतला.
गुरुवारी सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर वाघ याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
या प्रकरणाचा तपास सुरू असून, गोळीबारामागील नेमके कारण आणि आरोपींची भूमिका स्पष्ट होण्याकडे सर्वांचे लक्ष
लागले आहे.

वाघचीही मारहाणीची तक्रार

अटक आरोपी सागर वाघ यानेदेखील सिन्नर एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देत, ललित बोडके व त्यांच्या साथीदारांनी सोनगिरी येथे बोलावून कोयता व कुर्‍हाडीने मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन जबड्याला टाके पडले असून, एक दात तुटल्याचे नमूद करण्यात आले आहे. मारहाणीनंतर बेशुद्ध पडल्याने पुढील घटनांची आठवण नसल्याचेही त्याने
सांगितले आहे.

गोळीबाराबाबत नवा ट्विस्ट

गोळीबारासाठी वापरण्यात आलेले पिस्तूल सागर सूर्यवंशी (रा. कोटमगाव, नाशिक) याच्याकडे असल्याची माहिती समोर आली आहे. सूर्यवंशी हा नाशिकरोड पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. स्थानिकांकडून झालेल्या मारहाणीतून वाघला वाचवण्यासाठी सूर्यवंशीने गोळीबार केल्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, फिर्यादी ललित बोडके यांनी आपल्या तक्रारीत सागर वाघ याच्यावरच गोळीबाराचा आरोप केला आहे. त्यामुळे नेमका गोळीबार कुणी केला, याबाबत संभ्रम कायम असून, पोलिसांकडून सखोल तपास
सुरू आहे.

 

Songiri firing case; Suspect arrested

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

17 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

17 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

17 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

17 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

17 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago