तीन ट्रक विविध साहित्य जप्त
सिडको : प्रतिनिधी
सिडको विभागातील फुटपाथवर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई सुरू ठेवली आहे. सलग तिसर्या दिवशी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत तीन ट्रक विविध साहित्य जप्त करण्यात आले.
महापालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त सुवर्णा दाखणे यांच्या आदेशानुसार, तसेच विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. गोविंदनगर, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक, उत्तमनगर, उपेंद्रनगर आणि कामटवाडे रस्ता ते माउली लॉन्स या परिसरातील
फुटपाथवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. फुटपाथवर व्यावसायिक साहित्य आणि इतर वस्तू ठेवल्यामुळे पादचार्यांना चालताना अडचणी येतात. त्यामुळे नागरिकांना सुरक्षितपणे ये-जा करता यावी आणि फुटपाथचा वापर पादचार्यांसाठी करता यावा, या उद्देशाने महापालिकेने ही मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईत अतिक्रमण विभागाचे अधीक्षक राजेंद्र कवर, विभागप्रमुख निखिल तेजाळे, वाहनचालक उमेश इंगळे, पर्यवेक्षक अतुल पगारे, योगेश गरुड, वाजिद पठाण, प्रशिक मोरे व जीवन पवार यांच्यासह पथकातील कर्मचार्यांनी सहभाग घेतला.
फुटपाथ नागरिकांसाठी खुले राहावेत, यासाठी अतिक्रमणविरोधी कारवाई सातत्याने सुरू ठेवणे आवश्यक आहे. महापालिकेच्या या मोहिमेमुळे पादचार्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Action against encroachments in CIDCO area
वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…
नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…
महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…
शेतकर्याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…
समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…
बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…