नाशिक

संविधान बचाव समितीचा तिरंगा मोर्चा

निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

मालेगाव : प्रतिनिधी
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीसह मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेवर आक्षेप नोंदवत संविधान बचाव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि. 16) मालेगावात तिरंगा मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा पोलिसांनी सुरुवातीलाच रोखला. त्यामुळे आंबेडकर पुतळ्याजवळच मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
समाजवादी पक्षाचे नेते व मोर्चाचे संयोजक मुस्तकीम डिग्निटी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मोसमपूल परिसरातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत जाणार होता. मात्र, पोलिसांनी मोर्चाला पुढे जाण्यास मज्जाव केला. यानंतर उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सभेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली.
यावेळी इस्लाम पार्टीचे संस्थापक तथा माजी आमदार आसिफ शेख यांनी निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. निवडणूक आयुक्तांनी मतदारांचा विश्वासघात केल्याचा आरोप करत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. हे आंदोलन केंद्र सरकार किंवा पोलीस प्रशासनाच्या विरोधात नसून, निवडणूक आयुक्तांच्या विरोधात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपचे केंद्रातील नेते 2050 पर्यंत सत्तेतून जाणार नसल्याचे सांगतात, त्यामागील अर्थ आता लक्षात येत असल्याची टीकाही त्यांनी केली.
यावेळी उपमहापौर शान-ए-हिंद, मालेगाव मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेचे (मामको) संचालक राजेंद्र भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान इंजिनिअर, सामाजिक कार्यकर्ते निखिल पवार, वंचित बहुजन आघाडीचे संजय जगताप, शशिकांत पवार यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व
सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

‘Save the Constitution’ Committee’s Tricolour March

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

1 minute ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

5 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

17 minutes ago

पाथरे खुर्दमध्ये सशस्त्र दरोडा

शेतकर्‍याला मारहाण करून 12 लाखांचा ऐवज लुटला ♦ किचनचा दरवाजा तोडून चौघांचा बंगल्यात प्रवेश ♦…

24 minutes ago

मोहदरी घाटात कंटेनर उलटला; नाशिक-पुणे महामार्ग ठप्प!

समोरील टायर फुटल्याने अपघात सिन्नर : प्रतिनिधी नाशिक-पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शुक्रवारी (दि. 16) सकाळी…

30 minutes ago

दुष्काळाने त्र्यंबकनगरीवर पाणीकपातीचे सावट

बांधकामांवर पाण्याचा वारेमाप वापर, सिंहस्थ कुंभमेळ्यावरही परिणाम त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी पावसाने वेळेआधीच माघार घेतल्याने आणि…

37 minutes ago