नाशिक

फटाका सायलेन्सर लावणार्‍यांवर कारवाई

सिन्नर पोलिसांनी 52 दुचाकी केल्या जप्त; 50 हजारांची दंड वसुली

सिन्नर : प्रतिनिधी
मानवी आरोग्यास घातक आणि हानिकारक ठरणार्‍या फटाका सायलेन्सरवर सिन्नर पोलिसांनी शुक्रवारी (दि.9) कारवाईचा बडगा उगारला. सिन्नर शहरात वेगवेगळ्या भागात फिरून त्याचप्रमाणे आडवा फाटा येथे पोलीस बंदोबस्त लावून फटाका सायलेन्सर असलेल्या 27 बुलेट पोलिसांनी ताब्यात घेतल्या. याशिवाय, फॅन्सी नंबरप्लेट आणि कागदपत्रे नसलेल्या 25 दुचाकींवरही ऑनलाइन दंडात्मक कारवाई करण्यात आली. सुमारे 50 हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
शहरात बुलेटसह यामा आणि इतर दुचाकी वाहनांचे कंपनी फिटेड सायलेन्सर काढून अनेक दुचाकीस्वारांनी तेथे आर्टिफिशियल फटाकासदृश आवाज काढणारे सायलेन्सर बसवले आहेत. हे सायलेन्सर वाजवत फटाकासदृश आवाज काढत हे तरुण शहरभर हुंदडत असतात. विशेषतः शाळा, कॉलेज परिसरात अशा तरुणांचा नेहमी वावर असतो. फटाक्याचे आवाज काढत हे तरुण इतरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. रुग्ण आणि लहान मुलांसाठी मात्र हे फटाक्याचे आवाज त्रासदायक ठरत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी शुक्रवारी फटाका सायलेन्सरवर कारवाईचा बडगा उगारत शायनर दुचाकीचालकांना झटका दिला. शहरातील शिवाजी चौकापासून या मोहिमेला प्रारंभ झाल्यानंतर नेहरू चौकापर्यंत तब्बल 15 फटाका सायलेन्सर असलेल्या बुलेट पोलिसांना आढळून आल्या. त्यानंतर आडवा फाटा येथे पोलिसांनी बंदोबस्तात दुचाकीचालकांची तपासणी केली. दुचाकीचालकांना गाडीवरून उतरून पोलिसांनी सायलेन्सर कंपनी फिटेड आहेत की आर्टिफिशियल आहेत, याची खातरजमा केली. त्यानंतर आर्टिफिशियल सायलेन्सर असलेल्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. याशिवाय, कागदपत्रे नसलेल्या आणि फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या दुचाकीचालकांवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

फटाका सायलेन्सर करणार क्रश

फटाका सायलेन्सर शहरवासीयांची डोकेदुखी ठरत आहे. नागरिकांच्या तक्रारी नसल्या तरी पोलिसांनी
स्वतःहून कारवाईचा बडगा उगारला आहे. फटाका सायलेन्सर असलेल्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून, त्यांचे सायलेन्सर काढून ते रोडरोलरखाली क्रश करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी दिली.

Action against those who install firecracker silencers

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

3 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

3 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

3 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

3 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

3 hours ago