नाशिक

तळवाडे गावात ‘अभ्यासाचा भोंगा’; शिक्षणासाठी गाव एकत्र

सायंकाळी भोंगा वाजताच टीव्ही-मोबाइल बंद; सायंकाळी 7.30 ते रात्री 9 अभ्यास

मालेगाव : समाधान शेवाळे
मालेगाव तालुक्यातील तळवाडे ग्रामपंचायतीच्या वतीने “आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवूया” या विचारातून 1 जानेवारी 2026 पासून ‘अभ्यासाचा भोंगा’ हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. तळवाडे गावाने शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवा आदर्श निर्माण करण्याचा संकल्प केला असून, या उपक्रमामुळे संपूर्ण गावात सकारात्मक शैक्षणिक वातावरण निर्माण झाले आहे.
या उपक्रमांतर्गत दररोज सायंकाळी 7.30 ला अभ्यासाचा सायरन (भोंगा) वाजविण्यात येतो. भोंगा वाजताच संपूर्ण गावातील टीव्ही, मोबाइल, करमणुकीची साधने बंद ठेवून मुलांना अभ्यासासाठी बसवण्याची सामूहिक शिस्त पाळली जाते. रात्री 9 पर्यंत ही वेळ केवळ अभ्यासासाठी राखीव ठेवली आहे. या अडीच तासांत पालकांनीही मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देणे, त्यांना मार्गदर्शन करणे व घरात शांतता राखणे अपेक्षित आहे.
आजच्या डिजिटल युगात तळवाडेच्या सरपंच सारिका सोनवणे यांनी गावात अभ्यासाचा भोंगा ही संकल्पना मांडली. सोनवणे उच्चशिक्षित असून, गावातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असतो. गावात शाळाबाह्य मुले राहू नयेत आणि पाल्यांना पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणार्‍या पालकांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने सरपंच म्हणून मिळणार्‍या मानधनाच्या रकमेतून त्यांनी यापूर्वी संबंधित पालकांची शंभर टक्के घरपट्टी व पाणीपट्टी भरून दिली होती. त्यांचे पती श्यामकांत सोनवणे मालेगाव पंचायत समितीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
सरपंच सोनवणे यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला असून, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी, सोसायटी चेअरमन व सदस्य, जिल्हा परिषद शाळा तळवाडेचे मुख्याध्यापक व शिक्षक, वस्ती शाळा, अंगणवाडीसेविका, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष व सदस्य, जनता विद्यालय व पवार इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य-शिक्षक, तसेच राजकीय ज्येष्ठ नेते, पोलिसपाटील, तंटामुक्त समिती, सेवानिवृत्त अधिकारी आदींनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आहे. यावेळी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ग्रामसेवक केदारनाथ पवार, तंटामुक्ती अध्यक्ष मोरारजी शिरोळे, पोलिसपाटील चिंतामण शिरोळे, सदस्य सिंधुबाई निकम, सुनीता जाधव, सविता भोसले, मनीषा हिरे, माया कापडणीस, सुलाबाई बच्छाव, आबा ततार, सुभाष अहिरे, अनिल पवार, निंबा जाधव, केशव पवार, चेअरमन संदीप शिरोळे, दिलीप जाधव, भूषण बच्छाव, सचिन भामरे, शरद गलांडे, काकाजी शिरोळे, डॉ. मोहन मोरे, सागर वाघ, प्रशांत चव्हाण, उमेश सोनवणे, मल्हारी भोसले, सचिन अहिरे, भय्या अहिरे, शरद घोरपडे, दीपक आहिरे, सोनू अहिरे, प्रवीण अहिरे, सुनील पवार, संदीप हिरे, दीपक अहिरे, रवींद्र सोनजे, अंकुश दळवी, श्यामकांत सोनवणे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक शिरोळे यांनी केले व आभार मानले.

आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की, 7.30 ते 9.00 वाजेदरम्यान भोंगा वाजतो, ही वेळ अभ्यासाची आहे. यावेळी टीव्ही व मोबाइल बंद करून अभ्यासाला बसायचे. या उपक्रमामुळे सरपंचताईंचे आभार व्यक्त करतो.
– नयन गायकवाड,
विद्यार्थी, तळवाडे

‘Study Bell’ in Talwade village; Village unites for education

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

3 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

4 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

4 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

4 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

4 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

4 hours ago