नाशिक

म्हाडा प्रकरणात दोषींवर कारवाईच : महापौर

प्रशासनाची मात्र पाठराखण

नाशिक : प्रतिनिधी
शहरात गाजत असलेल्या म्हाडा सदनिका घोटाळा प्रकरणात महापालिकेतील दोषी अधिकार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. मात्र, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशासनासोबत आहोत. प्रशासकीय राजवटीत ज्यांनी काही गैरमार्ग अवलंबला असेल त्यांच्यावर कारवाई होणार आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. शहरात सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अनेक कामे सुरू असून, अशावेळेस महापालिकेची प्रतिमा काहींमुळे मलिन होता कामा नये, असे आवाहन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी पत्रकार परिषदेतून केले.
महापालिकेत मंगळवारी (दि.13) पत्रकार परिषदेचे आयोजन केले असता, महापौर आडके बोलत होत्या. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, स्थायी सभापती मच्छिंद्र सानप, उपमहापौर विलास शिंदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, अ‍ॅड. श्याम बडोदे आदी उपस्थित होते. नगररचना संचालक कल्पेश पाटील यांच्या अटकेने म्हाडा प्रकरण थेट महापालिकेत पोचले आहे. नगररचनेतील काही अधिकारी पोलिसांच्या रडारवर आहेत.
म्हाडा प्रकरणाची महापालिकेत सर्वत्र चर्चा आहे. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, फुटपाथ तसेच बाजारपेठांमध्ये वाढलेल्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब गांभीर्याने घेत महापालिकेकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. या कारवाईदरम्यान कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटले.

शहर 100 टक्के अतिक्रमणमुक्त करणार
सारडा सर्कल परिसरात करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईनंतर आता संपूर्ण शहरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती महापौर हिमगौरी आडके यांनी दिली. शहर 100 टक्के अतिक्रमणमुक्त करण्याचा निर्धार प्रशासनाने केला असून, यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महापौर आडके यांनी महापालिका ही शहराच्या विकासासाठी सातत्याने काम करणारी संस्था आहे. या माध्यमातून अनेक विकासकामे पूर्ण झाली असून, पुढील काळातही ती गतीने सुरू राहतील. काही व्यक्तींच्या कथित गैरप्रकारांमुळे संपूर्ण यंत्रणेला बदनाम करणे चुकीचे आहे.

कर्मचार्‍यांना तीन हजार रुपये वैद्यकीय भत्ता

महापालिका कर्मचार्‍यांना दरमहा तीन हजार रुपये वैद्यकीय भत्ता दिला जाणार असल्याची घोषणा महापौर आडके यांनी केली. कर्मचार्‍यांच्या आरोग्य सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सध्या वैद्यकीय उपचारांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून, अनेक कर्मचारी गंभीर आजारांमुळे आर्थिक अडचणीत सापडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने कर्मचार्‍यांना थेट आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने वैद्यकीय भत्ता देण्याचा निर्णय घेतल्याचे महापौरांनी सांगितले.

 

Action must be taken against the culprits in the MHADA case: Mayor

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

35 minutes ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

37 minutes ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

51 minutes ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

56 minutes ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

60 minutes ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

1 hour ago