नाशिक

पेठ रोडला फ्लॅटमधून 11 लाखांचे दागिने चोरीला

सिडको : प्रतिनिधी
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठ रोड परिसरात बंद फ्लॅट फोडून अज्ञातांनी 11 लाख 15 हजारांंचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण बाळू चारोस्कर (वय 36, रा. मैत्रप्रतीक अपार्टमेंट, सप्तरंग बिल्डिंगमागे, पेठ रोड, नाशिक) हे कुटुंबासह कामानिमित्त मूळ गावी पेठ येथे गेले होते. याच संधीचा चोरट्यांनी फायदा घेऊन त्यांच्या राहत्या घराचे, तसेच शेजारी राहणार्‍या नागरिकांच्या घराचे कुलूप व कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी घरातील सोन्याच्या माळा, पोत, नेकलेस, कानातील दागिने, अंगठ्या, नथ, लहान मुलांचे दागिने तसेच चांदीचे विविध दागिने असा एकूण 11 लाख 15 हजारांंचा ऐवज चोरी करून नेला.
चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये सुमारे 500 ग्रॅम चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक मद्रुपकर तपास करीत आहेत.

Action must be taken against the culprits in the MHADA case: Mayor

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

1 hour ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

1 hour ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

2 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

2 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

2 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

2 hours ago