परवाना नसलेल्या रॅपिडोर्र्, उबरच्या ई-बाईकवर कारवाई

नाशिक : प्रतिनिधी
महाराष्ट्र बाइक टॅक्सी नियम- 2025 अंतर्गत कोणताही अधिकृत परवाना नसताना शहरात अवैधरीत्या ई-बाइक टॅक्सीसेवा चालवणार्‍या रॅपिडो आणि उबर या कंपन्यांविरुद्ध नाशिकमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बेकायदेशीर सेवेमुळे प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने नागरिकांनी या टॅक्सींमधून प्रवास करू नये, असे महत्त्वाचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय नाशिक यांच्यामार्फत करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, नाशिक यांनी कोणत्याही अ‍ॅग्रीगेटर कंपनीला ई-बाइक टॅक्सीद्वारे प्रवासी वाहतुकीची परवानगी दिलेली नाही. असे असतानाही मोबाइल अ‍ॅपद्वारे ही सेवा सुरू ठेवून शासन आणि प्रवाशांची फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे.
परिवहन मंत्र्यांच्या निर्देशानुसार संबंधित कंपन्यांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. आरटीओ आणि पोलीस विभागामार्फत बेकायदेशीर वाहनचालक व सेवा पुरवठादारांवर कायदेशीर कारवाई सुरू आहे. त्यामुळे वाहनधारकांनीही आपली वाहने ई-बाइक टॅक्सी सेवेसाठी कोणत्याही कंपनीसोबत करारबद्ध करू नयेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

Action taken against unlicensed e-bikes from Rapido and Uber

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *