महाराष्ट्र

कुंभमेळ्याच्या विकासकामांसाठी देणार पुरेसा निधी

उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी
नाशिक येथे होणार्‍या आगामी कुंभमेळ्यासाठी आवश्यक विकासकामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असून, कोणत्याही कामाला निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.
नाशिक कुंभमेळ्यासाठी विविध विकासकामांना सविस्तर प्रकल्प अहवालअभावी प्रशासकीय मंजुरी दिल्याबाबत सदस्य सत्यजित तांबे यांनी प्रश्न उपस्थित केला. यावेळी सदस्य पंकज भुजबळ यांनीही चर्चेत सहभाग घेतला. मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, कुंभमेळ्यासाठी केंद्र व राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत एकूण 34 हजार 732.39 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, आवश्यक निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिला जाणार आहे.
कुंभमेळ्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला आवश्यकतेनुसार कामांमध्ये बदल करणे तसेच नवीन कामांचा समावेश करण्याचे अधिकार देण्यात आले असल्याने या कामांसाठी स्वतंत्र डीपीआरची आवश्यकता नसल्याचेही मंत्री सामंत यांनी यावेळी नमूद केले.
रस्ते रुंदीकरण व नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406.19 हेक्टर जमीन संपादित करण्याचे नियोजन आहे. त्यांपैकी 35.24 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यासाठी 352.57 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659.47 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रशासनाला सूचना

ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या प्रारंभिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याने विकासकामे एकाचवेळी सुरू आहेत. मात्र, वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच, सदस्य सत्यजित तांबे यांनी सुचविल्याप्रमाणे लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी नमूद केले.

प्रशासनाला सूचना

ऑक्टोबरपासून कुंभमेळ्याच्या प्रारंभिक कार्यक्रमांना सुरुवात होणार असल्याने विकासकामे एकाचवेळी सुरू आहेत. मात्र, वाहतुकीत अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या जातील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. तसेच, सदस्य सत्यजित तांबे यांनी सुचविल्याप्रमाणे लोकप्रतिनिधींची बैठक घेण्याबाबत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही मंत्री सामंत यांनी नमूद केले.

Adequate funds will be provided for Kumbh Mela development works.

 

 

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago