वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधनासाठी
30 जूनपर्यंत अर्ज सादर करावेत
:योगेश पाटील
नाशिक :
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत विविध क्षेत्रातील सन्मानार्थी वृद्ध साहित्यिक व यांना योजनेंतर्गत मानधन अदा केले जाते. जिल्ह्यातील इच्छुक वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी 30 जून 2023 पर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे अवाहन जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी केले आहे.
योजनेच्या लाभासाठी अर्जाचा नमुना पंचायत समितीच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षात या प्रकरणी निवड समितीची सभा जुलै अथवा ऑगस्ट 2023 मध्ये प्रस्तावित आहे. योजनेच्या लाभासाठी 7 फेब्रुवारी 2014 रोजीच्या शासन निर्णयातील अटीशर्तीनुसार मानधनासाठीचे प्रस्ताव इच्छुकांनी राहत असलेल्या तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयामार्फत 30 जून 2023 पर्यंत सादर करावा. अधिक माहितीसाठी तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, असेही समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील यांनी कळविले आहे
घिबली अॅपची कमाल मशालच्या जागी कमळ! मनमाड : आमिन शेख सध्याचा जमाना डिजिटलचा आहे. दररोज…
नियोजित वधुचे अफेअर उघड विवाहापूर्वीच आयकर अधिकारी असलेल्या वराने संपविले जीवन नाशिक : प्रतिनिधी नियोजित…
लासलगाव येथे पटेल सॉ मिलला आग श्री सिद्ध वीर हनुमान मित्र मंडळाच्या अग्निशमन टँकर मुळे…
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती अमाप उत्साहाने नाशिकरोड ः वार्ताहर…
शिधापत्रिकांची होणार तपासणी सिन्नर प्रतिनिधी तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध…
80 फेर्या सुरू; कमी दाबाच्या पाण्यामुळे नागरिक त्रस्त नाशिक : प्रतिनिधी वाढलेल्या तापमानाबरोबर शहरातील विविध…