ऐलतीर-पैलतीर

नदीच्या ऐलतीरावरून पैलतीरावर जर जायचं असेल तर आपल्याला तिचं ते भलंमोठं पात्र तर पार करावंच लागतं. त्याशिवाय आपल्याला पैलतीर गाठता येत नाही. अशात मग काही संकटेही येतात. कधी प्रवाहाचा वेग वाढून अडथळा येतो तर कधी प्रवाहासोबत येणारे त्रासदायक जीव त्रास देतात. कधी कचरा आला तर तो बाजूला सारावा लागतो. अन् मग पुढं जावं लागतं तो पैलतीर गाठायला.
अगदी तसंच काहीसं आपल्या आयुष्याचंही असतं ना!. आयुष्याचा ऐलतीर हा सुंदर अशा त्या बालपणीच्या कोवळ्या लुसलुशीत दाट हिरवळीने आच्छादलेला असतो. अगदी सुखद असाच तर पैलतीर म्हणजे उतारवय, वृद्धत्व आणि या दोन्ही तीरांच्या मधली जागा म्हणजे जीवनाच्या नदीचे तारुण्याचे विस्तीर्ण असे पात्र, जबाबदारी पेलण्याचा हा काळ असतो आणि त्या जबाबदार्‍या पेलताना आणि स्वतःला सिद्ध करताना त्या पैलतीरी जाण्याच्या काळात मात्र कैक अडथळेही पार करावे लागतात. कधीकधी सुखाच्या लहरीसोबत दुःखाच्या लहरीही येतात आणि त्यात मध्येच त्यांच्या प्रवाहाचाही वेग कधी तरी अचानक वाढतो. आणि त्याही मग सहन करून हातपाय मारून पुढं चालावं लागतं अन् तारुण्याचं ते पात्र शिताफीने पार करावं लागतं. ऐलतीरावरून तारुण्याच्या पात्रात स्वप्नं उराशी बाळगून उतरताना तर खूप छान वाटतं खरं पण जेव्हा कर्तव्य, जबाबदारी, स्वप्नपूर्ती यांच्या खाली आपण दबून जातो तेव्हा मात्र वाटतं की, खरंच तो ऐलतीर किती छान होता ना!
अन् मग पैलतीरावर गेलं तरी ऐलतीरी आपसूक वळून वळून पाहिलं जातं आणि मन मात्र सतत ऐलतीरीच त्या बालपणात मुक्तपणे रेंगाळत असतं. कारण पैलतीराच्या पुढली काही कल्पनाच आपण करू शकत नाही. त्यामुळे तेव्हा ऐलतीर आठवून रमल्याशिवाय पर्याय आपल्याला नसतो. खरं तर जिथून खर्‍या अर्थाने आपलं आयुष्य सुरू होतं आणि घडत असतं तो काळ खूप महत्त्वाचा असतो आणि मग बरेचदा तसंच काहीसं बालपणासारखं अल्लड वागलंही जातं. म्हणतात ना, वृद्धत्व म्हणजे दुसरं बालपणच अगदी तसंच काहीसं. आपल्याला कितीही वाटलं की, ऐलतीरीच थांबावं तरी ते नाही शक्य होत ना! कारण तसा निसर्ग नियमच आहे. आयुष्यात बालपणाच्या ऐलतीरावरून तारुण्याच्या पात्रात आणि मग उतारवयाचा तो पैलतीर तर आपल्याला गाठावाच लागतो. अन् मग शेवटी ऐलतीराच्या त्या प्रेमळ, आल्हाद आणि तनमनाला असीम असा गारवा देणार्‍या त्या सुखद अशा आठवणींच्या सिंचनाने तो पैलतीरही मग हिरवळ करण्याचा नक्कीच प्रयत्न होतो…
-वंदना गांगुर्डे

Bhagwat Udavant

Recent Posts

साप्ताहिक राशिभविष्य

पुरुषोत्तम नाईक दि. 17 ते 23 ऑगस्ट 2025 मेष : सुखवार्ता कळतील या सप्ताहात रवी,…

22 hours ago

असामान्य अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा, ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे वयाच्या 68 व्या वर्षी…

22 hours ago

गणेशोत्सवात ‘गोदावरी महाआरती’ ठरणार नाशिकचा अभिमान

देशभरातून आमंत्रणे; महाराष्ट्राच्या भक्तिभावाला नवी दिशा पंचवटी : प्रतिनिधी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा प्राण म्हणजे गणेशोत्सव.…

23 hours ago

पालकमंत्रिपदाचा वाद चिघळला

गिरीश महाजन यांच्या दाव्यानंतर भुजबळांचेही प्रत्युत्तर नाशिक : प्रतिनिधी नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद पुन्हा एकदा ऐरणीवर…

23 hours ago

पिनाकेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली दरीत कोसळून दोन महिला ठार

बोलठाण : प्रतिनिधी नांदगाव तालुक्यातील जातेगावपासून सात किलोमीटर अंतरावरील पिनाकेश्वर महादेव घाटात रविवारी (दि.17) सायंकाळी…

23 hours ago

निफाड उपविभागात साडेतीन हजार स्मार्ट मीटर बसविण्याचे काम सुरु

वीजचोरी रोखण्यास मदत; महावितरणाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना विश्वास निफाड : विशेष प्रतिनिधी विजेची हानी तथा गळती,…

23 hours ago