नाशिक

आयमाची वार्षिक सभा खेळीमेळीत

सर्व विषय एकमुखाने मंजूर

नाशिक: प्रतिनिधी

अंबड इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा)ची वार्षिक सर्वसाधारण के.आर. बूब सभगृहात अध्यक्ष निखिल पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.गत बैठकीचे इत्तीवृत वाचून मंजूर करण्यासाह विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना यावेळी सभासदांनी एकमुखाने मंजूरी दिली.

2022-23 या वर्षात आमच्या टीमने विविध 45 उपक्रम राबविले.आयमाला निर्यात व्यवस्थापन कर्यक्रमातून उत्पन्नाचा कायमस्वरूपी स्रोत निर्माण करून दिला..याच्या तिसऱ्या बॅचचा शुभारंभही लवकरच होणार आहे.आयमाची सूत्रे हाती घेताना जी ध्येय उराशी बाळगले होते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. आगामी वर्षातही उद्योजकांच्या विकासासाठी आपण सदैव प्रयत्नशील राहू,असे निखील पांचाळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले.माजी अध्यक्ष धनंजय बेळे,ज्ञानेश्वर गोपाळे,विवेक पाटील,जे आर वाघ,जे एम पवार,राजेंद्र अहिरे,एस एस बिर्दी, यांनी उद्योजकांना एकत्रित काम करण्याचे आवाहन केले.

निखिल पांचाळ,ललित बूब आणि त्यांच्या टीमच्या सातत्याच्या पाठपुराव्यामुळे दुहेरी फायरसेसच्या जाचातून अंबडच्या उद्योजकांची जवळजवळ सुटका झाली आहे. मालमत्ता कराबाबतही उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.या टीमने 2022च्या सुरुवातीला नाशिकच्या डोंगरे वसतीगृह मैदानावर आयमा इंडेक्स प्रदर्शन भरवून सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.औद्योगिक विकास महामंडळ,जिल्हा उद्योग केंद्र आणि महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ यांच्यासह विविध बैठका घेऊन उद्योजकांचे बहुसंख्य प्रश्न मार्गी लावले.सिंबायोसिसच्या मदतीने निर्यात व्यवस्थापन प्रोग्राम हा अभ्यासक्रम सुरू केला.यामुळे नाशकातील निर्यातदारांची संख्या वाढण्यास मदत होणार आहे.आयमाने अंबडसह सातपूर, सिन्नर तसेच जिल्ह्यातील उद्योजकांच्या अनेक समस्या सोडविल्या आहेत.अंबड एमआयडीसीसाठी सुरु झालेली स्वतंत्र पोलीस चौकी व 10 स्वतंत्र घंटागाड्या याचा गौरवाने उल्लेख करून उपस्थित सर्व सदस्यांनी पांचाळ,बूब आणि त्यांच्या टीमचा अभिनंदचा मांडलेला ठरावही यावेळी संमत झाला.

वार्षिक सर्वसाधारणसभेस आयामाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे,सुदर्शन डोंगरे,सचिव योगीता आहेर,खजिनदार राजेंद्र कोठावदे,आयपीपी वरूण तलवार,राधाकृष्ण नाईकवाडे, जयदीप अलिमचंदानी, जगदीश पाटील, देवेंद्र राणे,अविनाश बोडके,विराज गडकरी,रवींद्र झोपे,गौरव धारकर,हेमंत खोंड,के.एन पाटील,सिद्धार्थ रायकर,जयंत जोगळेकर,मनीष रावळ,सुमित बजाज, कुंदन डरंगे,संदीप जगताप,दिलीप वाघ, उन्मेष कुलकर्णी,अनिल डेंगरे,देवेंद्र विभूते,हर्षद बेळे,संजय महाजन,अभिषेक व्यास,सुनील अहिरे,विजय जोशी,एम.आर. पाटील,अशोक ब्राह्मणकर,राहुल गांगुर्डे,दिलीप पिंगळे,सतीश कोठारी तसेच आयमा कार्यकारिणी सदस्य व आयमा सभासद उपस्थित होते. सरचिटणीस ललित बुब यांनी आभार मानले.

 

—

 

 

 

 

 

 

 

 

Ashvini Pande

अश्विनी पांडे या 2019 पासून पत्रकारितेत कार्यरत असून, सध्या दैनिक गांवकरीत ऑनलाइन कंटेंट क्रीएटर तसेच उपसंपादक म्हणून कार्यरत आहे. त्यांना राजकीय व सामाजिक, सांस्कृतिक विषयाचे सखोल ज्ञान असून, साहित्य संमेलन, राजकीय सभा, राजकारणातील घडामोडी या विषयावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. विज्ञान शाखे बरोबरच पत्रकारितेतील पदवी बरोबरच साहित्यातील पदव्यूत्तर पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे.पत्रकारितेतील योगदानाबद्दल त्यांना विविध सन्मानही प्राप्त झालेले आहेत.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

16 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

16 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

16 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

16 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

16 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

17 hours ago