महाराष्ट्र

अजितदादा अनंतात विलीन; जनसागर लोटला

लाखो चाहत्यांच्या उपस्थितीत पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; भावनांचा कल्लोळ

पुणे : राज्याच्या राजकारणात गेल्या साडेचार दशकांपासून झंझावात निर्माण करत आपण कामाचा माणूस आहे, हे तत्त्व तहहयात जपताना केलेला संघर्ष या आणि असंख्य भावभावनांच्या हिंदोळ्यांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये काल (दि. 29 जानेवारी) राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या पार्थिवाला त्यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांनी मुखाग्नी दिला. यावेळी अवघ्या बारामतीसह राज्यात एकच सन्नाटा पसरला. विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात समर्थकांनी ‘अजितदादा अमर रहे’चा गजर करत आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप दिला.

यावेळी काटेवाडीपासून ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत महिलांसह कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अजितदादांच्या अखंड प्रेमाची साक्ष देत होता. नेहमी खडसावणरे दादा, मदतीसाठी धावणारे दादा आज निपचित आहेत हे अनेकांसाठी काळीज कुरतडणारे होते. त्यामुळे अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात चबुतरा उभारण्यात आला होता. चबुतर्‍यावर पवार कुटुंबीयांसह राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, आमदार राणा जगजितसिंह पाटील उपस्थित होते. अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली. मानवंदना देण्यात आल्यानंतर अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘अजितदादा अमर रहे’च्या गगनभेदी घोषणा देताच विद्या प्रतिष्ठानचा प्रत्येक कोपरा अन् कोपरा हळहळून गेला.
दरम्यान, अजित पवार यांचे पार्थिव काल सकाळी काटेवाडीत ठेवण्यात आले होते. यावेळी हजारोंच्या जमावाला अश्रू अनावर झाले. यावेळी झालेली अभूतपूर्व गर्दी पोलिसांनासुद्धा रोखणे अशक्य झाले होते. आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विनंतीनंतर जमाव नियंत्रित झाला. अजित पवार यांना मूळगावी श्रद्धांजली वाहिल्यानंतर त्यांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले.
दरम्यान, अजित पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी जेव्हा विद्या प्रतिष्ठानमध्ये आणण्यात आले तेव्हा शरद पवार अंत्यसंस्कारासाठी उभारण्यात आलेल्या चबुतर्‍यासमोरील मंडपात विमनस्क आणि खोल गर्तेत बसून होते. राजकीय नेत्यांकडून त्यांचे सांत्वन केले जात होते. यावेळीच काटेवाडीहून अजित पवार यांचे पार्थिव समोर येताच शरद पवार अत्यंत शोकाकूल अवस्थेत आणि डोळे पाणावलेले झालेले दिसून येत होते. अजित पवारांच्या चेहरा सुद्धा शेवटच्या क्षणी पाहता आला नाही ही सल अनेकांच्या मनात कायम राहणार आहे. अजित पवार यांचे अत्यंदर्शन घेण्यासाठी पत्नी खासदार सुनेत्रा पवार यांना पार्थिवाजवळ सुप्रिया सुळे यांनी आणलं. यावेळी अजित पवारांच्या दोन्ही बहिण, सून यांनीही अंत्यदर्शन घेतले. यावेळी पार्थ आणि जय यांच्यासह राणाजगजितसिंह पाटील यांच्यासह रोहित आणि युगेंद्र पवार बाजूला उपस्थित होते.
काटेवाडीत अंतिम दर्शनासाठी नागरिकांची गर्दी
गुरुवारी सकाळी काटेवाडी (बारामती) इथं असलेल्या अजित पवार यांच्या घरी सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं. अजित पवार यांचं जन्म हा काटेवाडी मध्ये झाला. याच गावात अजित पवार हे लहानाचे मोठे ते झाले. त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवातदेखील इथूनच झाली होती. राजकीय कारकिर्दीत मोठमोठ पद भूषणवूनही अजित पवार काटेवाडीमध्ये आपल्या लोकांशी संपर्कात असायचे. आपल्याकडं आलेल्या नागरिकांची विचारपूस करून त्यांची कामे अजित पवार करून द्यायचे. याच लाडक्या नेत्याला अखेरचे पाहता यावे, यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
काटेवाडी ते विद्या प्रतिष्ठानपर्यंत अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. या अंत्ययात्रेत बारामतीकर नव्हे तर राज्यभरातून आलेले विविध पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर दादांचं पार्थिव आणल्यावर दुपारी साडे बाराच्या सुमारास देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
परत या, परत या … अजितदादा परत या
अजित पवार यांच्या पार्थिवावर आज म्हणजेच गुरुवारी (दि. 29 जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आपल्या लाडक्या दादांना निरोप देण्यासाठी बारामतीत जनसागर लोटला. यावेळी कार्यकर्त्यांकडून परत या, परत या … अजितदादा परत या, थांबा! आमच्या दादांना नेऊ नका, आम्ही पाया पडतो अशा शब्दांमध्ये आक्रोश सुरू होता. संपूर्ण वातावरणात शोककळा पसरली आहे. सर्वांना आपले अश्रू थांबवून ठेवणे कठीण झालेे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळं राज्य सरकारकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या तीन दिवसांच्या कालावधीत महाराष्ट्रातील ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकविण्यात येतो, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात आला आहे. तसंच या कालावधीत कोणतेही शासकीय मनोरंजन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार नाहीत. कालपासून संपूर्ण बारामती ही बंद असून व्यापार्‍यांनी आपली दुकानं बंद ठेवली.

Ajitdada merged into infinity; the ocean of people flooded

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

जरांगेंचा ऑडिओ ‘बॉम्ब’

राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपकडून एसआयटी चौकशीची मागणी मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे…

2 days ago

हिरवा रंग नवरात्रीचा अन् निसर्गाचा

- विष्णू वाघ नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ रंगाच्या सुहासिनी साड्या परीधान करतात, पुरातन काळात अशी…

3 days ago

स्टेट्स माझं, गैरसमज तुमचे!

- अफजल पठाण शब्द टाकले मी सहज, कुणाला टोचण्यासाठी नव्हते, पण काहींच्या मनाला लागले, जणू…

3 days ago

तारीख पे तारीख

- अ‍ॅड.एन.एम. राठोड न्याय म्हणजे केवळ न्यायालयाने दिलेला निकाल नव्हे, तर अन्याय सहन करणार्‍या व्यक्तीला…

3 days ago

लगबग दिवाळीची

- योगिनी पैठणकर आमच्याकडे महालक्ष्मी आल्या की घर जरा हलू, फिरू, डोलू लागते! सगळे पसारे,…

3 days ago

रेणुकादेवी घाटाच्या पायथ्याशी आयशरची ट्रकला जोरदार धडक

चालक केबिनमध्ये अडकला; दोन्ही पाय फ्रॅक्चर चांदवड : वार्ताहर मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील श्री रेणुकादेवी घाटाच्या…

3 days ago