नाशिक

वावीत 19 जुलैपासून आखाडी उत्सव

गावदेवीच्या सोंगासाठी 1.65 लाखांची विक्रमी बोली

सिन्नर : प्रतिनिधी
पावसाने समाधानकारक हजेरी लावावी आणि शेती पिकांना बळ मिळावे, यासाठी वावी गावात 19 जुलैपासून पारंपरिक आखाडी उत्सवाला सुरुवात होत आहे. अनेक शतकांची परंपरा लाभलेल्या या उत्सवात देवी-देवतांची सोंगे, दशावतारी खेळ आणि धार्मिक विधींच्या माध्यमातून वरुणराजाला साकडे घातले जाणार आहे. यंदा गावदेवीच्या सोंगासाठी तब्बल 1 लाख 65 हजार 555 रुपयांची विक्रमी बोली लागल्याने उत्सव चर्चेचा विषय ठरला आहे.
ग्रामसचिवालयासमोर बुधवारी (दि. 15) सरपंच विजय काटे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत विधिवत पूजन करून उत्सवाचे ध्वजारोहण करण्यात आले. 19 ते 23 जुलै या कालावधीत दररोज रात्री 8 वाजल्यापासून आखाडी उत्सवाचे कार्यक्रम रंगणार आहेत. गणपती व सारजा पूजनानंतर पुराणातील विविध देवी-देवतांची सोंगे पिपाणी आणि डफाच्या तालावर सादर केली जाणार आहेत. 23 जुलै रोजी पहाटे गावदेवीचे सोंग निघणार असून दिवसभर गाव व परिसरात मिरवणूक काढल्यानंतर उत्सवाची सांगता होईल.
वावीतील आखाडी उत्सवाची परंपरा काही वर्षे खंडित झाली होती. मात्र ग्रामस्थांच्या पुढाकारातून सुमारे 15 वर्षांपूर्वी ती पुन्हा सुरू करण्यात आली. तेव्हापासून या उत्सवाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून परिसरातील धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणून हा उत्सव पाहिला जातो.
उत्सवाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून संत तुकाराम महाराज मंदिरात विविध सोंगांचा लिलाव पार पडला.
या लिलावातून मिळणार्‍या निधीतून सोंगांचे पोशाख, रंगभूषा, वाद्यवृंद, मंडप, ध्वनिव्यवस्था तसेच अन्य व्यवस्थांचा खर्च भागविला जातो. लिलाव प्रक्रियेला ग्रामस्थ आणि भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

विविध सोंगांचा लिलाव

यंदाच्या लिलावात गावदेवीच्या सोंगासाठी शंकर राजेभोसले यांनी 1 लाख 65 हजार 555 रुपयांची विक्रमी बोली लावली. नरसिंह सोंगासाठी विजय काटे यांनी 86 हजार रुपये, तर खंडोबाच्या सोंगासाठी प्रमोद वाजे यांनी 45 हजार 500 रुपयांची बोली लावली. महादेवाच्या सोंगासाठी 3 हजार रुपये, तर इतर सोंगांसाठी 500 ते 2 हजार 100 रुपयांपर्यंत बोली लागली. गणपती, मत्स्य, वराह, भीम, बकासुर, वीरभद्र, वेताळ, भैरवनाथ आणि राम-लक्ष्मण या सोंगांचाही लिलाव करण्यात आला.

 

 

Akhadi festival in Vavi from July 19

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

11 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

11 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

12 hours ago