नाशिक

तीन हजार अनधिकृत फलकांवर कारवार्ई

अतिक्रमणकडून शहरात मोहीम

नाशिक : प्रतिनिधी
शहरात अतिक्रमणाबरोबर अनधिकृत फलक लावणार्‍यांचे पेव फुटले आहे. दरम्यान, अतिक्रमण अनधिकृत होर्डिंग, बॅनर, बोर्डवर कारवाईला सुरवात केली आहे. 1 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीत तीन हजार 101 अनधिकृत फलक, बॅनरवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, तसेच शासकीय जागांवरील अनधिकृत फलकांवर कारवाई केली जात आहे. परवानगीशिवाय जाहिरात फलक लावणार्‍यांवर पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

आणखी दोन क्रेनची भर
नवी मुंबई परिसरातील अनधिकृत होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेने ही मोहीम आणखी तीव्र केली आहे. यासाठी शहरातील सहा विभागांमध्ये स्वतंत्र विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. या कारवाईसाठी दोन स्वतंत्र क्रेन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शासकीय जागांवरील अतिक्रमणांची संख्या खासगी जागांच्या तुलनेत अधिक आहे. महापालिकेच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत 203 होर्डिंग, एक हजार 356 बॅनर, 648 बोर्ड आणि 882 झेंडे हटविण्याची कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान खासगी, तसेच शासकीय जागांवरील परवानगीविना लावण्यात आलेले फलक हटविण्यात आले. विभागनिहाय पाहता सातपूर आणि नवीन नाशिक विभागात सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. सातपूर विभागात मोठ्या प्रमाणात झेंडे आणि बोर्ड हटविण्यात आले, तर नवीन नाशिक विभागात होर्डिंग, बॅनर आणि बोर्डांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. त्याशिवाय नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी व नाशिक रोड विभागातही नियमित मोहीम राबविण्यात आली.

 

Action taken on three thousand unauthorized billboards

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

न्यायपालिकेचे पावित्र्य आणि राजकीय हस्तक्षेप

न्यायपालिकेचे स्वातंत्र्य आणि तिचे पावित्र्य हा कोणत्याही लोकशाहीचा मुख्य कणा असतो; परंतु अलीकडच्या काळात न्यायपालिकेतील…

10 hours ago

…अन् झाला मारुती!

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण मोहिमेतील कथित अनियमितता आणि मतचोरीच्या आरोपांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…

10 hours ago

नवरात्रात नागालँडमध्ये रुग्णसेवेचा घेतला वसा

डॉ. कंचन लोकवाणी यांची अनोखी शक्तिउपासना ♣ ‘नवदुर्गा’ ♣ नाशिकरोड : अनिल गुंजाळ नवरात्र सुरू…

11 hours ago

कंत्राटी कर्मचार्‍यांची मनपासमोर निदर्शने

वॉटरग्रेसचा ठेका रद्दची मागणी नाशिक : प्रतिनिधी वॉटरग्रेस कंपनीने सुमारे दोनशे सफाई कामगारांना काढून टाकले…

11 hours ago

नाशकात रंगतोय रास-गरबा!

नाशिक : प्रतिनिधी नवरात्रोत्सवाच्या उत्साहात नाशिक शहरात सध्या रास गरब्याची रंगत पाहायला मिळत आहे. पारंपरिक…

11 hours ago

जीनिव्हात भारताच्या संस्कृतीचा कुंभ वैश्विक मंचावर

महापौर हिमगौरी आडके : रामकाल पथसह महत्त्वाच्या विकासावर चर्चा नाशिक : प्रतिनिधी स्वित्झर्लंड मधील जीनिव्हा…

11 hours ago